झोपड्यांचे पुनर्वसन करून मुंबई एअरपोर्टचा रनवे वाढवा..
झोपड्यांचे पुनर्वसन करून मुंबई एअरपोर्टचा रनवे वाढवा..
नवी दिल्ली, दि. १ डिसेंबर :
मुंबई इंटरनॅशनल एयरपोर्टवरील वाढत्या विमानाच्या संखेमुळे निर्माण होणारी समस्या दूर करण्यासाठी या विमानतळाजवळील झोपडपट्ट्याचे पुनर्वसन करून त्या ठिकाणी अतिरिक्त रनवे (धावपट्टी) तयार करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे फनेल झोनच्या नियमांमुळे एअरपोर्टच्या आसपासच्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास गेली अनेक वर्ष रखडल्याने या नियमातही आवश्यक ते बदल करण्यात यावेत, असे निवेदन मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी केंद्रीय उड्डयन मंत्री कींजरप्पु नायडू यांनी दिले आहे.
मुंबई इंटरनॅशनल एयरपोर्टवरील विमानांची वाढती संख्या यामुळे विमानांच्या उड्डयनामध्ये गंभीर समस्या बनली आहे. यामुळे विमानांना एयरपोर्टवर उतरण्यास परवानगी मिळत नसल्याने हवाई वाहतुक जाम होत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी या एयरपोर्ट जवळील झोपड्यांचे पुनर्वसन करून रिक्त होणाऱ्या जागेवर अतिरिक्त रनवे तयार करणे हा एकमेव उपाय आहे. येथील फनेल झोनच्या नियमांमुळे ऐरपोर्टच्या आसपासच्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास रखडला तर आहेच त्याच बरोबर येथील झोपड्यांचा पुनर्विकासही करण्यात आलेला नाही. फनेल झोनच्या अंतर्गत मुंबईतील अनेक इमारती येत असून यातील अनेक इमारती या खूप जुन्या असून पुनर्विकासच्या प्रतीक्षेत आहेत. आशा इमारतींच्या पुनर्विकाससाठी फनेल झोनच्या नियमांमध्ये आवश्यक ते बदल करून येथील धोकादायक इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करून या इमारतीत जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या राहिवाश्यांना न्याय देण्यात यावा, अशी मागणीही वायकर यांनी निवेदना द्वारे केली आहे.
ही गंभीर समस्या सोडवण्यासाठी या विषयाशी निगडीत सर्व संबंधित विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, यांची संयुक्त बैठक घेण्यात यावी. या बैठकीच्या आयोजनाची माहिती खासदार म्हणून मला देण्यात यावी. या बैठकीत वरील सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करून ही समस्या सोडवण्यासाठी उचित ती पावली उचलणे आवश्यक आहे. येथील झोपड्यांचे पुनर्वसन करताना त्यांना चांगली घरे, पाणी व अन्य मूलभूत सुविधा देणे आवश्यक आहे. या समस्या सोडवताना करण्यात येणारा मास्टर प्लॅनमध्ये पर्यावरणाचा विचार करावा तसेच ही योजना मार्गी लावावी, अशी सूचनाही खासदार वायकर यांनी लेखी निवेदनाद्वारे केंद्रीय उड्डयन मंत्री कींजरप्पु नायडू यांनी केली आहे.
