महात्मा फुलेंच्या विचारांनी मुख्य प्रवाहात आणले.

0
IMG-20241128-WA0078

महात्मा फुलेंच्या विचारांनी मुख्य प्रवाहात आणले.

पुणे, दि.२८ नोव्हेंबर:-

महात्मा फुले यांचे समग्र वाड्मय वाचल्यानंतर माझ्या आयुष्यात खूप मोठे बदल घडले आहेत. माझ्या दिशाहीन जीवनाला महात्मा फुले यांच्या विचारांनीच मुख्य प्रवाहात आणले म्हणून मी आज इथपर्यंत येऊ शकलो असे अभिनेते, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सांगितले.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या लेखक, दिग्दर्शक, अभिनेते नागराज मंजुळे यांना ‘समता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

नागराज मंजुळे म्हणाले की, आई वडिलांसोबतच छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर हे आपल्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत. हे महापुरुष नसते तर आज आपण इतक्या गुण्या गोविंदाने राहू शकले नसतो. आपले सुखकर जीवन या महापुरुषांमुळे झाले असून त्यांच्या पुण्याईने आपण इथे आहोत. आपले जगणे आणि आपले हक्क समजण्यासाठी महात्मा फुले यांचे चरित्र वाचले पाहिजे असे मत अभिनेते नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले.

यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे विभागीय अध्यक्ष प्रित्येश गवळी यांनी केले. तर सूत्रसंचालन शहराध्यक्ष पंढरीनाथ बनकर व महिला शहर अध्यक्ष वैष्णवी सातव यांनी केले.याप्रसंगी मानपत्राचे वाचन प्रा.गौतम बेंगाळे यांनी केले.

या सोहळ्याच्या प्रारंभी पुण्याचे माजी महापौर उल्हास नाना ढोले पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *