Ads

--

‘गुलाबी’ रंग विजयाचे प्रतिक…

By Xtralarge News

November 23, 2024 8:11 pm

Ads

‘गुलाबी’ रंग विजयाचे प्रतिक…

मुंबई, दि. २३ नोव्हेंबर –

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांवर चालत सर्वसमावेशक भूमिकेतून काम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्रदीपक यशासाठी मतदानरुपी आशीर्वाद दिल्याबद्दल राज्यातील तमाम नागरिकांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.

राज्यातील आमच्या लाडक्या बहिणींनी हाती घेतलेली ही लढाई आपण सर्वांनी एकमेकांच्या साथीने जिंकली असून महिला सन्मानाचा आणि विजयाचे प्रतीक असणारा ‘गुलाबी रंग’ आज राज्यभर मोठ्या उत्साहात उधळला जात आहे असेही सुनिल तटकरे यांनी ट्विट करत म्हटले आहे.

हे दैदिप्यमान यश राज्यातील जनतेसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांचे आहे. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि पुढेही राहू असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी यावेळी दिला.

No comments to show.

Leave a Comment