Ads

--

रत्नागिरीतून शिवसेनेचे उदय सामंत विजयी.

By Xtralarge News

November 23, 2024 5:17 pm

Ads

रत्नागिरीतून शिवसेनेचे उदय सामंत विजयी.

 

रत्नागिरी, दि. २३ नोव्हेंबर :-

266 रत्नागिरी विधानसभा मतदार संघात सर्वाधिक 1 लाख 11 हजार 335 मते मिळवून उदय रविंद्र सामंत हे विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी घोषित केले. बाळ माने यांना दुसऱ्या क्रमांकाची 69 हजार 745 इतकी मते मिळाली.

 

येथील सामाजिक न्याय भवन मध्ये सकाळपासून मतमोजणीला प्रारंभ झाला. यावेळी निवडणूक सामान्य निरीक्षक जनक प्रसाद पाठक, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी भेट देऊन मतमोजणी प्रक्रियेची पाहणी केली. पहिल्या फेरीपासूनच सामंत हे आघाडीवर होते. निवडणूक निर्णय अधिकारी देसाई यांनी मतमोजणी नंतर सर्वाधिक मते मिळालेल्या सामंत यांना विजयी घोषित केले. यानंतर त्यांनी प्रमाणपत्र आणि बुके देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी निवडणूक सामान्य निरीक्षक पाठक उपस्थित होते.

 

No comments to show.

Leave a Comment