उजनी सोलापूर पाईपलाईन कधी पूर्ण होणार?

0
20200915_183455

सोलापूर, दि. 19 :

उजनीच्या पाण्याचा विषय हा सोलापूरकरांच्या जिव्हाळ्याचा आहे. नागरिक, शेतकरी यांच्या समस्या दूर करून आणि भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून उजनी ते सोरेगावपर्यंतची वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनचे काम गतीने करण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रशासनाला दिल्या.

सोलापूर शहराला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा व्हावा, यासाठी उजनी धरणातून आणखी एक 110 किमी लांबीची पाईपलाईन मंजूर झाली आहे. ही पाईपलाईन संपूर्ण जमिनीखालून असणार आहे. याबाबतच्या आढावा बैठकीत  भरणे यांनी केल्या.

भरणे म्हणाले, पाईपलाईनचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करावे. पाईपलाईन जमिनीखालून असल्याने शेतकऱ्यांचे जास्त नुकसान होणार नाही. त्यांना त्या जमिनीवर सर्व पिके घेता येणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी पाईपलाईनसाठी अडवणूक करू नये.

पाईपलाईन माढा, मोहोळ आणि उत्तर सोलापूर तालुक्यातून जात असून यात 35 गावांचा समावेश आहे. 138 हेक्टरच्या वापर हक्कासाठी भूसंपादनाचे काम सुरू आहे. 35 पैकी 34 गावातील मोजणीचे कामही झाले आहे. बाधित जमिनीवरील वृक्ष, शेती, घरे यांचे पंचनामे व मूल्यांकन करण्याचे काम त्वरित सुरू होत असल्याची माहिती सूर्यवंशी यांनी दिली.

सोलापूर महापालिकेने फेब्रुवारी 2020 रोजी राज्य शासनाला प्रस्ताव पाठविला असून त्यानुसार शासनाकडून वापर हक्काच्या संपादनाचा इरादा राजपत्राद्वारे प्रसिद्ध होणे बाकी आहे. राजपत्र प्रसिद्ध झाल्यानंतर पुढच्या 21 दिवसात बाधित खातेदारांच्या लेखी हरकती घेऊन 30 दिवसात हरकतीवर सुनावणी होऊन निर्णय दिला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *