देवा भाऊ, देवा भाऊ आता सर्वजण एकत्र खाऊ…

0
IMG-20240107-WA0102

देवा भाऊ, देवा भाऊ आता सर्वजण एकत्र खाऊ…

कन्नड दि , ७ नोव्हेंबर;

महाराष्ट्रात सर्वत्र चिखल पसरला, कमळ यावे म्हणून सगळा चिखल केलाय, आणि हा चिखल आपल्याला साफ करायचा आहे, अडीच वर्षांपूर्वी आपलं सरकार पडल्यानंतर भाजप राज्याची लूट करीत आहे. घटनाबाह्य आणि अवकाळी सरकार जनतेच्या डोक्यावर बसवलय.असं म्हणतानाच ‘निवडणूक आयोगाला अधिकार नाही की आपल चिन्ह चोरून गद्दाराना द्यायचा, मात्र निवडणूक आयोगाने तो दिला, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचा काढलेला फोटो तो एकनाथ शिंदे यांनी चोरला, असं टीकास्त्र आदित्य ठाकरे यांनी डागले..

राज्यातलं सरकार केवळ घोषणा करण्यात मग्न आणि लूट करण्यात व्यस्त असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली तसचं यावेळी बोलताना ते म्हणाले की ‘या सरकारने घोषणा केलेले एकही महामंडळ टिकले नाही . उद्धव ठाकरे यांनी कुटुंब प्रमुख म्हणून निर्णय घेतले . तेव्हा सगळे अधिकारी हादरले होते, लोकांमध्ये खळबळ निर्माण करणारे निर्णय घेतले होते . हिंदू मुस्लिम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत . दोन वर्षात अनेक वाद निर्माण झाले . भाजपचे हिंदुत्व हे चूल पेटवणारे नाही तर घर पेटवणारे आहे, आपले हिंदुत्व तोंडात राम हाताला काम असल्याचं म्हणतानाच आपल्याला भाजप आणि एकनाथ शिंदे सारखे गद्दार अडवू शकत नाही, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

आपल्या भाषणात बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की ‘माफी गुन्हेगाराला असते, शेतकरी हा गुन्हेगार नाही . आपण कुठे त्यांना माफ करणार ? ते आपले अन्नदाते आहेत . दोन वर्षात आम्ही पूर्ण महाराष्ट्र फिरलो . दुष्काळ, गारपीट,जिथं जिथं अडचण आहे तिथं गेलो आहोत. आमच्या हातात सरकार आणि यंत्रणा नव्हती मात्र विश्वास होता. मागील महिन्यात बीडमध्ये आपण फिरत होतो, म्हणून मुख्यमंत्री तिथं फिरत होते आणि केवळ फोटो काढत होते आणि कृषिमंत्री कधी पाहिले आहेत का ? आधी कृषिमंत्री अब्दुल गद्दार होते . इथे कापसाला आणि सोयाबीन पिकाला भाव नाही. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या कडून आधार देणारे कुणी नाही. सत्तेत बसलेले माजलेले आहेत . हे खोकेवाले धोके देत आहेत पण २३ तारखेला सरकार बदलणार हा मी शब्द देतो, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

गेल्या दोन वर्षात उद्योग मंत्र्यांचे नाव ऐकले का ? दोन वर्षात मोठा उद्योग राज्यात आला असे ऐकले का ? असा सवाल उपस्थितांना करतानाच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते उद्योग इथच राज्यात आले असते, असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला तसेच देवेंद्र फडणवीस यांना विचारायचे की उद्योग गुजरातला पाठवले मात्र लाज वाटली का ? उद्योग पळवून नेऊन मोदी यांनी आमच्या दुःखावर मीठ चोळलय, असे म्हणत टीकाही केली.

आपल्या भाषणात आदित्य ठाकरे म्हणाले की महिला ही महिला असते, तिचे रक्षण आणि सत्कार व्हायलाच हवा. आम्ही महिलांवर अन्याय करणारे लोक मंत्री मंडळातून काढून टाकतो, मात्र यांनी मांडीला मांडी लावून मंत्री मंडळात बसवलं. चिंधी चोर वामन म्हात्रे असे नालायक लोक तुम्हाला मान्य आहेत का ? असा सवाल जनतेला करतानाच बलात्कार करणाऱ्याला फाशी देणारा शक्ती कायदा आपण आणू, असा शब्द महिलांना दिला. तसेच भाजप मध्ये असलेले अनेक लोक आहेत ज्यांच्यावर घाणेरडे आरोप आहेत . कर्नाटकात २५०० महिलांवर अत्याचार केले आहेत, हे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात, अशी टीका केली.

आत्ताच्या सरकारने फसवी योजना आणली . सगळ्या महिलांच्या मध्ये बसून म्हणायचे पैसे आले, पैसे आले, जसे खोके आले खोके आले ? दीड हजारात का कंपनी खरेदी करणार आहेत का महिला ? आणि यांच सरकार आल्यावर पैसे नाहीत सांगून १५०० चे १५० देतील. मात्र आपले सरकार आल्यास ३००० हजार देणार, महिलांना प्रवास मोफत करून देणार, असा शब्द आदित्य ठाकरे यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *