IMG-20200918-WA0025

कांदा उत्पादकांना राज्य सरकारने मदत करण्याची केली मागणी.

राहाता, दि. १८ सप्टेंबर:

कांदा निर्यात बंदी उठवावी ही सर्वाचीच मागणी असून याबाबत केंद सरकार लवकरच निर्णय करेल आशी अपेक्षा आहे.मात्र कांद्याच्या प्रश्नावरून केंद्र सरकारला लक्ष करण्यार्या महाविकास आघाडी सरकारने मागील सहा महीन्यात शेतकऱ्यांना कोणती मदत केलीॽ असा सवाल माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना आ. विखे पाटील म्हणाले की, कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेवून निर्यात बंदी उठवावी आशी मागणी केली असल्याचे स्पष्ट करतानाच आ. विखे पाटील म्हणाले की, कांदा निर्यात बंदीचा निर्णय केंद्र सरकार मागे घेईल तोपर्यंत राज्यातील महाविकास आघाडी सरकार आपले दायित्व का निभावत नाही. केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवून राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप आ. विखे पाटील यांनी केला.

आज कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचे भांडवल करुन महाविकास आघाडी सरकार रस्त्यावर येवून करीत असलेल्या आंदोलनांवर टिका करुन आ.विखे म्हणाले की, सहा महीन्यांपासून राज्यातील शेतकरी अर्थिक संकटात सापडला आहे. करोनामुळे बाजार समित्या बंद राहील्या शेती उत्पादीत मालाला भाव नाही.शेतकऱ्यांनी कवडी मोल भावाने आपला माल विकला तेव्हा महाविकास आघाडी मधील मंत्री आणि नेते झोपले होते का ॽ ऐन पेरणीच्या काळात शेतकऱ्यांसमोर युरीया खताची टंचाई होती.सोयाबीन बियाणांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाली तेव्हा आजचे आंदोलन करणारे कुठे होतेॽ असे प्रश्न उपस्थित करून राज्य सरकारकडून मागील सहा महीन्यात शेतकऱ्यांना कवडीचीही मदत झालेली नाही.केंद सरकार कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेईपर्यत राज्य सरकारने कांदा उत्पादकांना मदत करावी आशी मागणी विखे पाटील यांनी केली.

नगर मनमाड मार्गाच्या संदर्भात यापूर्वी प्रशासनाचे लक्ष आपण वेधले होते. रस्त्याच्या कामासाठी अर्थसंकल्पात तरतूद केल्याचे सांगण्यात येते मग काम सुरू का होत नाही, जनतेची सहनशीलता आता संपली आहे.या सरकारला आंदोलनाचीच भाषा कळत असेल तर रस्त्याच्या कामासाठी रस्त्यावर उतरूनच आंदोलन करण्याची आमची तयारी असल्याचा इशारा विखे पाटील यांनी दिला, तसे पत्रही मी आधीच दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *