पुण्यातील गुन्हेगारीला सत्ताधाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे का?

0
20231130_111009

मुंबई, दि. २ सप्टेंबर:-

राज्यातील प्रमुख शहारापैकी एक असलेल्या पुण्यामध्ये खळबळजनक घटना घडली आहे. शहरात भर चौकात गोळ्या घालून एकाची हत्या करण्यात आली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राज्यातील सत्ताधाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे का? असा सवाल त्यांनी

जयंत पाटील म्हणाले की, पुणे शहरात भर चौकात एका व्यक्तीची गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. गेल्या काही वर्षांत पुण्यातील टोळी युध्दाने परिसीमा गाठली आहे. पुण्यातील अंमली पदार्थांचे साठे सापडण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. विद्येचे माहेरघर असणारे पुणे सत्ताधारी आणि यंत्रणेच्या नाकर्तेपणामुळे देशभर बदनाम होऊ लागले आहे. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राज्यातील सत्ताधाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे का?

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *