महायुती सरकारला बदलापूर घटनेचे गांभिर्य नाही.

0
IMG-20240823-WA0086

नाशिक, दि. २३ ऑगस्ट ;
बदलापूरच्या जनतेच्या मनात चिड निर्माण झाल्याने उद्रेक झाला व त्यातून आंदोलन झाले पण निर्ढावलेल्या महायुती सरकारने त्यांच्यावरच गुन्हे दाखल करुन जेल मध्ये टाकले. बदलापूरच्या घटनेची उच्च न्यायालयाने स्वतः दखल घेऊन सरकारची खरडपट्टी काढली तरी सरकारला लाज वाटत नाही. महायुती सरकारला बदलापूरच्या घटनेचे गांभीर्यच नाही, राज्यातील सरकार आंधळे झाले आहे, लहान मुलीही सुरक्षित राहिलेल्या नाहीत, असा संताप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र बंद हा जनतेचा आहे, सामान्य नगारिक म्हणून या बंदमध्ये सहभागी होणार, कोणावरही जबरदस्ती केली जाणार नाही, शांततेत बंद केला जाईल व कोर्टाचा अपमान करणार नाही, असेही नाना पटोले म्हणाले.

काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली आहे. महिला,शाळकरी मुलींवरील अत्याचार रोखण्यात महायुती सरकार अपयशी ठरले आहे. बदलापुरची घटना अत्यंत गंभीर असून पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यासही विलंब लावला. महायुती सरकारच्या विरोधात जनतेत प्रचंड रोष आहे. बदलापूरच्या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी महाराष्ट्र बंदमध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सरकार विरोधात आवाज उठवावा, असे आवाहन प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *