एकमेकांचा बाप काढण्याचा अधिकार तुम्हाला दिला ?

0
images - 2024-07-18T202750.323

मुंबई, दि. ९ ऑगस्ट :

मराठा समाजाचे लोक सगळ्या पक्षांत नेतृत्व करताहेत. दोन-चार अपवाद वगळले तर या महाराष्ट्राचे नेतृत्वच मराठा समाजाच्या नेत्यांनी केलेले आहे. आता प्रत्येक जात मोठी की पक्ष मोठा अशा प्रकारचे समाजविघातक वक्तव्य जरांगेंनी करू नये. पक्ष मोठा की बाप यापेक्षा आंदोलनाचा बाप हा मराठा समाज आहे. जो मराठा समाज सर्व पक्षांत. त्यामुळे एकमेकांचा बाप काढण्याचा अधिकार तुम्हाला कुणी असा सवाल भाजपा नेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.

नारायण राणे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना अरेतुरे बोलणे, त्यांची धुलाई करणार बोलणे, छगन भुजबळांविषयी अशलाघ्य बोलणे, चंद्रकांत पाटील यांना चंपा बोलणे. त्यामुळे अशा प्रकारचे बोलणे मराठा समाजाला आवडणारे नाही. मराठा समाजाच्या लेकराला उघडं पाडायचा हा माझा अजिबात उद्देश नाही. उलट मराठा समाजाचे हे लेकरू जागृत राहिले पाहिजे. कुणीतरी या लेकराला चालवू नये आणि आपले राजकारण करू नये अशा प्रकारची अपेक्षा त्यांच्याकडून आहे. मराठा समाजाला बऱ्याच वर्षांनी आपले कुणीतरी भुमिका घेऊन काम करतेय हा विश्वास येऊ घातला होता तो जाऊ नये याची काळजी आम्ही घेत असल्याचेही दरेकर म्हणाले.

 

दरेकर पुढे म्हणाले की, जरांगे यांना देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल असलेला आकस, पोटशूळ काही कमी होताना दिसत नाही. फडणवीसांनी मराठा समाजाचे भविष्य घडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मराठा समाजाचे भविष्य नासविण्याचा कुणी प्रयत्न केलाय ज्यांनी एवढी वर्ष नेतृत्व केले, ज्यांनी मराठा समाजाच्या भविष्यासाठी काहीच केले नाही त्यांना एका शब्दाने विचारत नाही. ज्या फडणवीसांनी आरक्षण दिले, टिकवले, फेटाळले गेले नाही त्यांना दोष देणार. ज्यांनी सारथी, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एक लाख उद्योजकांना स्वतःच्या पायावर उभे केले ते कसे काय समाजाचे अहित बघू शकतात. परंतु जरांगेंना देवेंद्र द्वेष आहे. फडणवीस त्यांच्या राजकारणाचा टार्गेट आहे. त्यामुळे ते आरक्षणावर, मराठा समाजाच्या प्रश्नांवर बोलत नाहीत. सरकारशी चर्चा करत नाहीत. ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी भुमिका काय आहे अशी विचारणा शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंना करावी मात्र त्यावर जरांगे काहीच बोलत नाहीत. केवळ हमरीतुमरीवर येऊन एकेरी बोलणे, घाणेरड्या शब्दांत विभत्सना करणे हे समाजातील कुठल्याच सुसंस्कृत समाजाला आवडणारे नाही.

 

दरेकर पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य दिलेले आहे. म्हणूनच आपण आज मोकळेपणाने भुमिका मांडतोय. राज ठाकरे यांना धाराशिव बाहेर जाऊ दिले नसते अशा प्रकारच्या धमक्या देण्याचे काम जरांगेंनी करू नये. शांतता रॅली आहे तीचे स्वरूप शांततेचे असावे रागाचे नसावे. त्या रॅलीच्या माध्यमातून समाजहिताच्या गोष्टी व्हाव्यात. समाजातील प्रतिष्ठित लोकांचे मार्गदर्शन घ्यावे. परंतु ते न करता तेथील राजकीय पुढारी कोण, तेथील निवडणुका कुणाला लढवायच्या आहेत. उमेदवार कोण उभा करता येईल, कोणाला पाडण्यासाठी कटकारस्थान करावे लागेल. हा मराठा समाजाचा फोकस नाही. मराठा समाजाचे नेतृत्व त्या-त्या पक्षात, मतदार संघात प्रगल्भ आहे. त्यांना त्यांची राजकीय भुमिका समजते. परंतु आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी मराठा समाजाच्या भावनांशी खेळू नये, अशी विनंती असल्याचेही दरेकरांनी सांगितले.

 

तसेच एका बाजूला मराठा समाजाच्याविषयी बोलताना हळूच धनगरांचा, दिव्यांग समाजाचा पुळका येतो. हळूच बारा-बलुतेदारांची काळजी वाटते. म्हणजे सर्व राजकीय नियोजनबद्ध मतांची गोळाबेरीज करत, भविष्यातील राजकारणाची मांडणी यातून स्पष्ट दिसून येते. त्यामुळे मराठा समाजाच्या प्रश्नांपासून बगल दिली जातेय. आपण करतो तेच मराठा आंदोलन आणि दुसऱ्यांनी घेतलेली भुमिका म्हणजे मराठ्यांचे आंदोलन नाही. मराठा समाजाच्या संघटना गेली २०-२५ वर्ष आपल्या वेगवेगळ्या क्षमतेनुसार काम करताहेत त्यांची किंमत शून्य का? त्या नेत्यांना अभ्यास, पाठबळ नाही का? हे सारे नेते समाजात वितुष्ट होऊ नये या भावनेने गप्प असल्याचेही दरेकर म्हणाले.

दरेकर पुढे म्हणाले की, पावसात भिजल्याविषयी वक्तव्य केले. आम्ही बोलून बोलून काहीतरी स्पष्ट भुमिका आली. परंतु अळीमिळी गुपचिळी अशा प्रकारचे चालू आहे. हा संदेश शरद पवारांच्या भिजण्यावर होता. परंतु त्यांच्या पक्षातील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. याचा अर्थ तु मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो. ही अंतर्गत हातमिळवणी आहे हे स्पष्ट होताना दिसतेय. जरांगेंना राजकारण करण्याचा, निवडणुका करण्याचा अधिकार आहे. खरंच निवडणूक लढवणार का हे येणाऱ्या काळात समजेल की न लढवता कुणाला पूरक अशी भुमिका घेऊन पाडापाडीला महत्व देणार हेही कळेल. घोडंमैदान लांब नाही.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *