महाराष्ट्र लुटून सुरतेला देणाऱ्या महायुती सरकार विरोधात चार्जशिट!

0
IMG-20240804-WA0128

मुंबई दि. ५ ऑगस्ट;

महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकवण्याचा मविआचा प्रयत्न आहे. महाभ्रष्टयुती सरकारने राज्याचा स्वाभिमान विकला आहे, हे सरकार गुजरात धार्जिणे आहे. महाराष्ट्र लूटन सुरतेला देण्याचे काम सुरु आहे. महाराष्ट्रातील जमिनी, संपत्ती विकत आहेत अशा परिस्थितीत महाराष्ट्र वाचवणे हाच मविआचा संकल्प आहे. या मुद्दांवर बैठकीत चर्चा झाली. तसेच राज्यातील विविध मुद्दे घेऊन महाभ्रष्टयुती सरकार विरोधात चार्जसिट बनवून ते प्रसिद्ध केले जाणार आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

लाडकी बहिण योजनेला काँग्रेसचा विरोध नाही. भाजपा व सत्ताधारी पक्षातील जे लोक काँग्रेसविरोधात असा अपप्रचार करत आहेत ते पराभवाने घाबरले आहेत. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेशी काँग्रेसचा काहीही संबंध नाही. तेलंगणा, कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने महिलांसाठी महालक्ष्मी योजना सुरु केलेली आहे, संजय गांधी निराधर योजना अनेक वर्षांपासून सुरु आहे. महायुती सरकारनेच काँग्रेसच्या योजनांची नक्कल केली आहे. महायुती सरकार महिलांना फक्त १५०० रुपये देणार आहे परंतु काँग्रेस सत्तेत आल्यास महिलांना लखपती केले जाईल.

कैदेतील सचिन वाझे संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, गृहमंत्री फडणवीस म्हणतात त्याच्याकडे व्हिडिओ, ऑडिओ आहेत, वाझे म्हणतो फडणवीसला माहिती दिली तर फडणवीस म्हणतात माझ्याकडे कसलाही कागद दिला नाही, ही सर्व नौटकी चालली आहे. कैदेतील व्यक्ती मीडियाशी कसा काय बोलू शकतो पण काँग्रेसला या विषयावर फार चर्चा करण्याची गरज वाटत नाही.

आजच्या बैठकीला विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील गटनेते सतेज बंटी पाटील, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, आमदार भाई जगताप, माजी मंत्री अस्लम शेख, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *