20200916_205844

मुंबई, दि.16 सप्टेंबर:

अभिनेत्री कंगणा राणावत ही दोन महिन्यांपासून  बाॅलिवूड, महाराष्ट्र, मुंबई, मुंबई पोलीस ,बीएमसी,  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वाट्टेल त्या शब्दात गरळ ओकत असताना आता तीने जया बच्चन यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्याचे कारण जया बच्चन यांनी राज्यसभेत बोलताना कंगणाचे नाव न घेता तीचा समाचार घेतला होता.जिस थाली मे खाया उसी मे छेद किया असे त्या म्हणाल्या होत्या.

काही लोकांमुळे संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीला बदनाम करू शकत नाही. ज्या इंडस्ट्रीने आपल्याला नाव दिले त्याच इंडस्ट्रीला गटार म्हणणे योग्य नाही असे जया यांनी म्हटले होते. जया बच्चन यांच्या राज्यसभेतील सडेतोड भूमिकेनंतर त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत.
काहींनी जया यांना पाठिंबा दिला तर काहींनी विरोध केला आहे.
जया बच्चन यांनी समाचार घेतल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. राज्य सरकारने याची गंभीर दखल घेत बच्चन कुटुंबाच्या मुंबईतील दोन्ही बंगल्यांना तातडीने अधिक सुरक्षा पुरवली आहे. अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या हे मुंबईत दोन बंगल्यामध्ये रहात आहेत या दोन्ही बंगल्यांना तातडीने सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *