अजित पवारांची जनसंवाद यात्रा नाशिकमधून..
नाशिक, दि. २८ जुलै :-
राज्यातील शेतकरी, महिला, विद्यार्थी, युवक यांच्यासह विविध घटकांसाठी १ लाख कोटी रुपयांच्या योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रचार प्रसार करण्यात यावा. असे आवाहन करत अजित पवार यांच्या जनसंवाद यात्रेची सुरुवात नाशिकमधून होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.
अजित पवार यांच्या जनसंवाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची सन्मान यात्रा नाशिकमध्ये आहे. त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय नाशिक येथे आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. सुनील तटकरे म्हणाले की, गेल्या ३५ वर्षापासून अजित पवार राजकारणात प्रभावीपणे काम करत आहे. त्यांना बदनाम करण्याचे काम करण्यात आहे. विरोधकांकडून आपल्याला नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपण त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी काम करावे असे आवाहन त्यांनी केले.
विविध योजनांची घोषणा करून महाविकास आघाडी सरकारला जमिनीवर आणण्याचे काम अजित पवार यांनी केलं आहे. राज्यात विविध घोषणा करत असताना आर्थिक समतोल साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. राज्यातील शेतकरी, महिला, विद्यार्थी, युवक यांच्यासह विविध घटकांसाठी १ लाख कोटी रुपयांच्या योजना सुरू केल्या आहेत. त्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवा. येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सर्वाधिक यश कसं मिळेल यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले की, अजित पवार यांच्या जनसंवाद यात्रेची सुरुवात नाशिकमधून होणार आहे. सर्व विधानसभा मतदारसंघात अजितदादा पवार सर्व ज्येष्ठ नेत्यांसमावेत जाणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ, खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली आपण येणाऱ्या निवडणुकीत मोठे यश मिळवू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी मुंबई अध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, महायुती सरकारच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत आहे. या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते करत आहे. येणाऱ्या निवडणुकीत पक्षाच्या वतीने ज्या ज्या ठिकाणी उमेदवार उभे केले जातील त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सर्व काम करतील असे त्यांनी सांगितले.
