अमोल कोल्हेंच्या नौटंकीपणाला भुलू नका.

0
IMG-20230706-WA0125

चाकण, दि. १२ मे :

अभिनेता चांगल्या प्रकारे अभिनय करू शकतो आता निवडणुकीतही त्याची नौटंकी, नाटकीपणा सुरू आहे. कदाचित ते डायलॉगबाजी करू शकतात पण सर्वसामान्यांची कामं करू शकत नाहीत. शिरूरच्या जनतेने विकास करणाऱ्यांच्या बाजूने उभे रहावे, केवळ डायलॉगबाजी करणाऱ्यांच्या डायलॉगला भुलू नये, असे आवाहन भाजपा नेते प्रविण दरेकर यांनी केले.

 

शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या सभेत बोलताना प्रविण दरेकर यांनी अमोल कोल्हे यांच्यावर तुफान फटकेबाजी केली. दरेकर म्हणाले की, जाणता राजा साताऱ्यात पावसाची एक सर अंगावर आली तेथील खासदार निवडून आला अजित पवार तर अखंड पावसात भिजताहेत मतांचा पाऊस त्यांच्यावर पडल्याशिवाय राहणार नाही. ही निवडणूक देशाच्या दृष्टीने महत्वाची आहे. कोण खासदार होणार, कुठल्या पक्षाचा होणार यापेक्षा या देशाने नेतृत्व कोण करणार ही ठरवणारी ही निवडणूक आहे. देशवासियांनी ठरवले आहे की १० वर्ष मोदी देशाला प्रगतीकडे नेऊ शकतात तर पुढील पाच वर्षही देशाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील. ही देशाचा पंतप्रधान कोण असणार हे ठरविणारी निवडणूक आहे. गेली ५० वर्ष जे काँग्रेसवाले करू शकले नाहीत ते १० वर्षात पंतप्रधान मोदींनी प्रामाणिकपणे देशाच्या विकासासाठी काम केले, हे आपण नाकारू शकत नाही.

 

दरेकर पुढे म्हणाले, काल त्यांची सभा झाली. त्या सभेत आढळराव पाटील, अजित पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका झाली. त्यापलीकडे भाषण गेले नाही. विकासाच्या चार गोष्टी भाषणात आल्या नाहीत. आढळराव पाटील यांनी कुठल्यातरी देवस्थानाची १३ एकर जमीन लाटली असल्याची टीका केली. अरे अमोल कोल्हे दुसऱ्याच्या ताटात वाकून बघताना अशोक पवार जे घोडगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. मल्लिकार्जुन देवस्थानाने ११३ एकर जागा दिली होती ती जागा हडप करण्याचे काम अशोक पवारांनी केलेय. जे देवाला फसवतात ते तुमची सेवा काय करणार. घोडगंगा कारखाना बंद आहे. स्वतःचा खासगी व्यंकटेश्वर कारखाना सुरु आहे. परंतु सर्वसामान्यांचा कारखाना सुरू नाही हे अमोल कोल्हेचे कर्तृत्व असल्याचा घणाघातही दरेकरांनी केला.

 

पंतप्रधान मोदी, नितीन गडकरी यांच्या माध्यमातून रस्त्यांचे जाळे विणले जातेय. विकास दिसून येतोय. आम्ही विकास करणारी लोकं आहोत. तुम्ही विकास करणाऱ्यांच्या बाजूने उभे रहा केवळ डायलॉगबाजी करणाऱ्यांच्या डायलॉगला भुलू नका. आमची सत्ता ही सर्वसामान्यांसाठी आहे. ती तुम्हाला कळणार नाही. तुम्ही जनतेत नसता, पाच वर्षातून एकदा उगवता हे शिरूरवासियांना माहित आहे. चासकमाण कालव्यासाठी महायुती सरकारने देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने १९५७ कोटी रुपये दिले. आम्ही देणारे आहोत. अबकी बार ४०० पारचा नारा दिलाय. त्यावेळी या ४०० पारमध्ये छत्रपतींच्या भूमितील आमचे शिवाजी आढळराव पाटील गेले पाहिजेत, ती जबादारी पार पाडा, असे आवाहनही दरेकरांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *