IMG-20200725-WA0014

नवी दिल्ली, दि.11 सप्टेंबर:
मराठा आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून आघाडी सरकारला जोरदार धक्का बसल्याने समाजात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. भाजपाने याचे खापर ठाकरे सरकारवर फोडले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याच दखल घेतली आहे. सरकारने मराठा आरक्षण संदर्भात अध्यादेश आणावे असे त्यांनी म्हटले आहे.
नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, मला जिथपर्यंत कायदा कळतो त्याप्रमाणे मराठा आरक्षणा संदर्भात अध्यादेश आणू शकतो. फेरविचार याचिका दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. आम्हाला मराठा आरक्षण प्रकरणी राजकारण करायचे नाही तर विद्यार्थ्यांना दिलासा द्यायचा आहे. काहींना मराठा समाजात प्रक्षोभ वाढावी असं वाटत असेल.

मराठा आरक्षणावरुन केंद्र-राज्य असा वाद नको असे आवाहन करत मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मराठा आरक्षण प्रकरणात जे वकील दिले ते ख्यातनाम होते. कपिल सिब्बल किंवा महाधिवक्ते हे ज्युनिअर आहेत का? असे प्रश्न करून भाजपाच्या आक्षेप धुडकावून लावला.

इतर राज्यात आरक्षण दिले तर मग महाराष्ट्राने अपेक्षा केली त्यात काही गैर वाटत नाही. विरोधकांना मराठा आरक्षणवरून राजकारण करायचे आहे. आंदोलन करुन काही होणार नाही तर हा प्रश्न कोर्टातच सुटणार आहे. सरकार पुन्हा एकदा कोर्टात जाणार आहे, असेही शरद पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *