Ads

--

शरद पवारांच्या NCP ची पहिली यादी जाहीर..

By Xtralarge News

March 30, 2024 7:31 pm

Ads

मुंबई, दि ३० मार्च :

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पाच उमेदवरांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये वर्धा, दिंडोरी, बारामती, शिरूर आणि अहमदनगर लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये पहिली यादी जाहीर केली आहे.

जयंत पाटील म्हणाले की, जयंत पाटील यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पहिल्या यादीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रियाताई सुळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर शिरूर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघातून अमर काळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भास्करराव भगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जयंत पाटील यांच्या वतीने अशा पाच उमेदवारांची आम्ही पहिली यादी जाहीर केली आहेत. उर्वरित उमेदवारांची यादी पुढील काही दिवसांत जाहीर केली जाईल असे जयंत पाटील यांनी सांगितले.

जयंत पाटील म्हणाले की, भाजपला पराभूत करण्यासाठी समविचारी लोकांनी एकत्र लढण्याचा निर्धार केला पाहिजे. काही लोक जर वेगळे लढण्याचा विचार करत असेल तर समविचारी मतांमध्ये विभागणी होईल. त्यामुळे सर्वांनी एकसंधपणे लढलं पाहिजे असे जयंत पाटील म्हणाले.

No comments to show.

Leave a Comment