Ads

--

राष्ट्रवादीने कंगणाला सुनावले खडे बोल!

By Xtralarge News

September 10, 2020 10:02 am

Ads

 

मुंबई दि. 10 सप्टेंबर :

व्यावसायिक संधी… महिला सुरक्षा आणि सहिष्णुतेच्या दृष्टीने मुंबई आणि महाराष्ट्राने देशासमोर आदर्श ठेवला आहे. मात्र त्याबद्दल काही लोकं कृतज्ञ नाहीत, हे खूप वेदनादायक आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मुंबई व महाराष्ट्राबद्दल अपशब्द वापरणाऱ्या कंगना राणावत हिचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी समाचार घेतला आहे. या सुरक्षित शहराची, इथल्या पोलीस दलाची तुलना पाकिस्तानासोबत होणं हे अत्यंत निंदनीय आहे. अशी वक्तव्य म्हणजे फक्त प्रसिद्धीसाठी केलेला खटाटोप आहे अशी जोरदार टीका जयंत पाटील यांनी कंगना राणावत हिचे नाव न घेता केली आहे.

आमची माय मुंबई… ही भेदभाव न करता सर्वाना कवेत घेणारी आहे. त्यामुळे मुंबईचा आणि राज्यातील सर्वोच्च पदांचा सन्मान हे आमचे कर्तव्य आहे असा इशाराही जयंत पाटील यांनी दिला आहे.

No comments to show.

Leave a Comment