Ads

---

काँग्रेस सत्तेत आली तर MSP लागू करणार..

By Xtralarge News

February 13, 2024 11:14 pm

Ads

काँग्रेस सत्तेत आली तर MSP लागू करणार..

नवी दिल्ली, दि. १३ फेब्रुवारी:

शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमांवर पुन्हा आंदोलन सुरु केले आहे. हे आंदोलन दडपण्याचा भाजपा सरकार पुरजोर प्रयत्न करत आहे. शेतमालाला हमी भाव द्यावा ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले असतानाचा काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची व ऐतिहासिक घोषणा केली आहे.

राहुल गांधी यांनी छत्तिसगडच्या एका जाहीर सभेत मोठी घोषणा केली, ते म्हणाले की, “काँग्रेस पक्षाची सत्ता केंद्रात आली तर शेतमालाला हमी भाव देण्यारा MSP कायदा लागू करू व स्वामीनाथन कमिशनचा अहवाल स्विकारु”. हा निर्णय झाला तर देशातील १५ कोटी शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. स्वामिनाथन कमिशनचा अहवाल स्विकारताच MSP ची गॅरंटी देण्याची राहुल गांधी यांची घोषणा अत्यंत महत्वाची आहे.

दोन वर्षापूर्वी शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवर मोठे आंदोलन केले होते, हे आंदोलन एक वर्ष चालले यात ७०० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला परंतु मोदी सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले होते. शेवटी मोदी सराकरने नमते घेत मागण्या मान्य केल्या पण त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. आता काँग्रेस पक्षाने ऐतिहासिक घोषणा केल्याने मोदी सरकार काय निर्णय घेते हे पहावे लागणार आहे.

No comments to show.

Leave a Comment