Ads

-

राम मंदिराचे काम मोदींनी सर्वांकडून करवून घेतले.

By Xtralarge News

February 8, 2024 10:03 pm

Ads

आळंदी, दि. ८ फेब्रुवारी :

भगवान श्रीकृष्णाने एकट्याने गोवर्धन उचलला नाही तर सगळ्यांना त्याने हात लावालया सांगितले तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्यांकडून श्रीरामजन्मभूमी मंदिराचे काम करवून घेतले आहे, असे उद्गार सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.

गोविंददेव गिरी महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आळंदी येथे आयोजित गीता भक्ती संमेलनात ते बोलत होते. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, गोविंददेव गिरी महाराज यांचे रामजन्मभूमी मंदिराच्या कार्यात मोठे योगदान आहे. त्यांच्या हातून श्रीरामासह या समाजाची अखंड सेवा घडावी आणि त्यांची शताब्दी आम्हाला त्यांच्या सोबत साजरी करता यावी हीच ईश्वरचरणी माझी प्रार्थना आहे. गोविंददेव गिरी महाराज हे भारताची अशी संपत्ती आहेत की जे भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी अविरत धडपडत आहेत.

साध्वी ऋंतभरा यांचा श्रीरामजन्मभूमी आंदोलनातील आठवणीही मुनगंटीवार यांनी सांगितल्या. त्यांच्यासोबत कधी कुठल्या कार्यक्रमात एकाच मंचावर बसता येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते, पण आचार्य गोविंददेव गिरी महाराजांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात तो योग आला, त्य़ाचा मला मनस्वी आनंद झाला. आमच्या जीवनात केवळ राम सर्वात महत्वाचा आहे, असेही उद्गार त्यांनी काढले.

अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मंदिरासाठीचे संपूर्ण सागवानी काष्ठ हे चंद्रपूरच्या आपल्या मतदारसंघातून दिले असल्याचे अभिमानाने नमूद करून ते म्हणाले की श्रीरामजन्मभूमी मंदिराची अशी सेवा हातून घडणे हे मोठे भाग्य आहे. ते काष्ठही परमपूजनीय आचार्य गोविंददेव गिरी महाराजांच्या हस्तेच पूजन करून रवाना करण्यात आले होते, अशी आठवणाही त्यांनी सांगितली.

 

यावेळी बोलतांना आचार्य गोविंददेव गिरी महाराज यांनी सांगितले की श्रीरामाचे सर्व गुण आपल्यात यावेत हीच खरी साधना आहे. विविध संतमहात्म्यांचे आपल्या आयुष्यात जे प्रेम मिळाले, तीच माझी संपत्ती आहे, असे सांगून आचार्य गोविंददेव गिरी महाराज पुढे म्हणाले की देश देव संस्कृतीची सेवा निरंतर हातून घडत रहावी हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींपासून शिवाजी महाराजांपर्यंत सर्वांनी हेच आपल्याला शिकवले आहे. “देश से है प्रेम तो हर पल ये कहना चाहिये, मै रहूं या ना रहूं भारत ये रहना चाहिये” अशी प्रार्थनाही त्यांनी केली.

यप्रसंगी सुधीर मुनगंटीवार यांनी बांबू पासून बनविलेली श्रीरामजन्मभूमी मंदिराची प्रतिकृती गोविंददेव गिरी महाराजांना भेट देऊन त्यांचा सत्कार केला.

No comments to show.

Leave a Comment