रोहित पवारांची दुसऱ्यांचा ED चौकशी..

0
Rohit pawar

मुंबई, दि. २ फेब्रुवारी;

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची ईडीने दुसऱ्यांदा चौकशी केली. तब्बल आठ तास चौकशी केल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. याआधी २४ जानेवारीला त्यांची ईडीने चौकशी केली होती.

ईडी चौकशीनंतर बाहेर आलेल्या रोहित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, ते म्हणाले की, देशात आणि महाराष्ट्रात जे काही चालू आहे त्याविरोधात आवाज उठवल्यामुळेच ही कारवाई केली जात आहे. तपास यंत्रणांच्या माध्यमातून लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. सामान्य माणसांच्या मुद्द्यावर चर्चा केली जात नाही त्यामुळे त्यांचे मुद्दे घेऊन लढत असल्यामुळे आपल्यावर कारवाई होत आहे. मी कारखाना घेण्यापूर्वी जे डायरेक्टर होते, त्याबद्दल काही जणांकडून आक्षेप घेण्यात आले. एक याचिका करण्यात आली त्यात माझे नाव कुठेच नव्हते. EOW ने या प्रकरणी दोनदा चौकशी केली, त्यांनी सखोल चौकशी केली. EOW ने क्लोजर रिपोर्ट दिला असतनाही माझी चौकशी केली जात आहे, असेही रोहित दादा म्हणाले.

मी व्यवसायात आधी आलो आणि नंतर राजकारणात. आम्ही विचारांसाठी लढत आहोत. राज्य सरकारमध्ये सत्तेत असणाऱ्या नेत्यांना वाटत असेल की आम्ही घाबरलो आहोत पण जे घाबरले ते याआधीच पळून गेले ते सर्वांनी बघितले आहे, असेही रोहित पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *