Ads

-

‘पळणारा नाही लढणारा दादा!’ 

By Xtralarge News

January 24, 2024 5:33 pm

Ads

मुंबई, दि. २४ जानेवारी:

विरोधी पक्षांच्या मागे ईडीचा ससेमिरा पुन्हा सुरु झाला असून राष्ट्रवादी कँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. शिवसेनेच्या सुरज चव्हाण यांना ईडीने कोठडीत पाठवले आहे तर किशोरी पेडणेकर यांचीही चौकशी होत आहे तसेच माजी मंत्री रविंद्र वायकर, आमदार राजन साळवी यांच्यामागेही चौकशीचा समेमिरा सुरु आहे.

ईडी चौकशीला जाताना रोहित पवार म्हणाले की, अधिकाऱ्यांनी आतापर्यंत जी कागदपत्रे मागवली ती सगळी कागदपत्रे दिली आहेत. आज पुन्हा चौकशीला बोलावले आहे,तेथे जाऊन मी पुन्हा त्यांना माहिती देईन. अधिकाऱ्यांना चौकशीत सहकार्य करेन. सर्वसामान्यांचा आवाज महाशक्तीविरोधात उठवल्यानंतरच ईडी कारवाई झाली असावी असे लोकांचे मत आहे.

चूक केली नसेल तर घाबरण्याचें कारण काय? त्यांनी मला नुसतेच बसवून ठेवले तर मला मोकळा वेळ मिळेल आणि त्या वेळेत मी सरकार विरोधात कशा पद्धतीने रणनिती आखायची याबाबत विचार करेन. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी काय करता येईल याबाबत कार्यालयात वेळ मिळाला तर चर्चा करेन. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा सर्वसामान्य माणूस आहे. मी मराठा माणूस म्हणून प्रामाणिकपणे लढत राहणार, पळून जाणार नाही, असे रोहित पवार म्हणाले.

 

 

आमदार रोहित पवार ईडी कार्यालयात चौकशीला जाणार असल्याने राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमले होते. कार्यकर्त्यांकडून रोहित पवार यांच्या समर्थनात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी शरद पवार दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

बलार्ड पियर परिसरात ठिकठिकाणी रोहित पवारांचे बॅनर लावण्यात आले आहेत.‘पळणारा नाही तर लढणारा दादा’ असे बॅनर वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आले होते.ईडी कार्यालय परिसरात दडपशाहीच्या कारवाईचा निषेध असे लिहिलेले बॅनरही लावण्यात आले होते.

No comments to show.

Leave a Comment