वस्त्रोद्योग धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करा..

0
IMG-20240123-WA0174

वस्त्रोद्योग धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करा..

मुंबई, दि.२४ जानेवारी :

एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२०२८ अंतर्गत अनेक नाविन्यपूर्ण योजना आखण्यात आल्या आहेत.वस्त्रोद्योग व्यवसायाची एक दर्जेदार शृंखला निर्माण होण्यासाठी शेतकरी, वस्त्रोद्योग घटक आणि रोजगार निर्मिती यावर अधिक भर देऊन वस्त्रोद्योग धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावीअशा सूचना वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास अधिनियमाचे प्रारूप, टेक्नो टेक्सटाईल पार्क, मिनी टेक्सटाईल पार्क, गारमेंट पार्क, सौर ऊर्जा वापर धोरण, यंत्रमाग व रेडिमेड गारमेंटस उद्योगांना लेबर सबसिडी या विषयांवर सविस्तर चर्चा करून सर्व वस्त्रोद्योग घटकांचा आढावा घेतला.यावेळी वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, वस्त्रोद्योग आयुक्त गोरक्ष गाडीलकर, उपसचिव व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले,शेतीशी निगडित असलेल्या तुती लागवड उद्योगातून शेतकरी बांधवांची जीवनमान उंचावण्यासाठी तुती ते रेशीम ही साखळीअधिक सोपी करून ती विकसित करावी.आणि राज्यात रेशीम उद्योगाला अधिक चालना द्यावी असेही मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील हातमाग विणकारांचा सर्वे करून जनगणना करण्याबाबत आढाव घेण्यात आला.तसेच रेशीम कोष बाजारपेठ व्यवस्थापन संगणक प्रणाली राज्यस्तरीय राबविण्याबाबतही आढावा घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *