Ads

-

विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणाचा कायदा.

By Xtralarge News

January 23, 2024 6:31 pm

Ads

मुंबई, दि. २३ जानेवारी:

मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट आणि सकारात्मक आहे. ओबीसी समाज व इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देणार आहोत. ही सरकारची जबाबदारी आहे. संपूर्ण मागासवर्ग आयोग त्यासाठी २४ तास तीन शिफ्टमध्ये त्यासाठी काम करत आहे. दीड लाख लोक त्यासाठी काम करत आहेत. गोखले इन्स्टिट्यूट, टाटा इन्स्टिटयूट त्यासाठी काम करत आहेत. हा आयोगाचा अहवाल आल्यानंतर विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणाचा कायदा सरकार करणार आहे हा शब्द सरकारने दिलेला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे. पूर्ण प्रक्रिया आपण करतोय, सर्वेक्षण सुरु आहे.म्हणून मराठा आंदोलनकर्त्यांना माझी विनंती आहे, की सरकार मराठा आरक्षण देण्याबाबत सकारात्मक आहे. हे सरकार देणारे आहे. म्हणून मराठा समाजाने आंदोलनाची भूमिका न घेता संयम बाळगावा व सरकारला सहकार्य करावे. हीच आमची विनंती आहे, हीच आमची अपेक्षा आहे.

 

No comments to show.

Leave a Comment