Ads

--

मराठा आरक्षणासाठी मी सुचवलेला तोडगा स्विकारा..

By Xtralarge News

January 21, 2024 7:15 pm

Ads

मराठा आरक्षणासाठी मी सुचवलेला तोडगा स्विकारा..

मुंबई दि. २१ जानेवारी –
मराठा समाजातील गरिबांना आरक्षण देण्याचा निर्णय शासनाने त्वरित घ्यावा. मराठा नेते मनोज जरांगे यांचे गरिब मराठ्यांना आरक्षण देण्याचे आंदोलन तीव्र होत आहे.या प्रश्नावर मी सुचवलेला तोडगा शासनाने स्विकारावा. तामिळनाडु प्रमाणे महाराष्ट्रात आबीसीचे दोन प्रवर्ग तयार करावे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

ओबीसीचे आता आहे त्या 27 टक्के आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाच्या आरक्षणासाठी वेगळा स्वतंत्र ओबीसीचा प्रवर्ग निर्माण करावा. तामिळनाडूमध्ये जसे ओबीसीचे दोन प्रवर्ग आहेत तसेच महाराष्ट्रात ओबीसीचे दोन प्रवर्ग तयार करावे त्यामुळे  एस.सी, एस टी, ओबीसी यांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजातील  गरिबांना ओबीसी म्हणुन आरक्षण मिळेल. मराठा समाजातील ज्यांचे उत्पन्न 8 लाखा पेक्षा कमी आहे अशाच गरिबांना आरक्षण द्यावे अशी मागणी आहे.

ओबीसीना सुद्धा क्रिमिलेयरची अट आहे. ज्यांचे वार्षीक उत्पन्न 8 लाखाच्या आत आहे अशा ओबीसींनाच आरक्षणाचा लाभ मिळतो, सर्व ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही.त्याप्रमाणे मराठा समाजातील ज्यांचे वार्षीक उत्पन्न 8 लाखाच्या आत आहे अशाच गरिब मराठा समाजाला आरक्षण द्यावे.त्यामुळे गरीब मराठा समाजासाठी तामिळनाडुच्या धर्तीवर महाराष्ट्रात आणखी स्वतंत्र प्रवर्ग तयार करुन मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

No comments to show.

Leave a Comment