Ads

--

…तर मंत्रालयही गुजरातला घेऊन जातील.

By Xtralarge News

January 10, 2024 11:43 pm

Ads

…तर मंत्रालय गुजरातला घेऊन जातील.

हातकणंगले, दि. १० जानेवारी.

सगळे उद्योग गुजरातला नेले आहेत, हे खोके सरकार पुन्हा आले तर मंत्रालय गुजरातला घेऊन जातील..धमकावून, जबरदस्तीने सगळे उद्योग गुजरातला नेले.. राज्यात किती लाख नोकऱ्या तयार झाल्या असत्या. आमचं सरकार असतं तर वेदांता फॉक्सकोन कंपनी गुजरातला गेली नसती, पण त्या जात असताना इतका अकार्यक्षम मंत्री मी कधीही पाहिला नाही. असं म्हणत सरकारवर जोरदार हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केला.

महानिष्ठा, महान्याय संवाद दौऱ्यात हातकणंगले मध्ये बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही आज जो न्याय मागत आहे तो शिवसेनेसाठी नाही तर राज्यासाठी, देशासाठी न्याय मागत आहोत. जे उद्धव ठाकरे यांच्या पाठीत वार करून गेलेत..आता मुख्यमंत्री आहेत त्यांच्यावर ईडीची धाड पडली होती. ते तुरुंगात जाणार होते.

राष्ट्रवादी काँग्रेस काम करू देत नाही.. हिंदुत्वाचे कारण सांगितलं जायचं, पण यांचं हिंदुत्व खरं आहे का ? आमचं हिंदुत्व म्हणजे हृदयात राम आणि हाताला काम हे आहे.कोल्हापुरातील एक गद्दार माजी आमदार घरात घुसून मारहाण करतो पण कोणतीही कारवाई केली जात नाही.

 

महाराष्ट्राच्या पदरात काही चांगलं पडलं आहे का? अच्छे दिन आले का? चारी बाजूला महागाई वाढली आहे. कोरोनात राज्य पुढं कसं न्यायचं हे उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिलं जागतिक पातळीवर उद्धव ठाकरे यांचे कौतुक झालं.कोरोनात जात पात न पाळता सगळ्यांची काळजी घेतली . शेतकऱ्यांची कर्ज मुक्ती उद्धव ठाकरे यांनी केली.. भाजपची पोटशूळ ही होती की महाराष्ट्र मागे का राहत नाही ? महाराष्ट्रात दंगल का होतं नव्हती ? अश्यातच भाजपला ४० गद्दारांची साथ मिळाली असे म्हणत सरकारचा भोंगळ कारभार आणि मविआच्या काळातील कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडतानाच आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि खोके सरकारवर टीका केली.

 

No comments to show.

Leave a Comment