दिल्लीने डोळे वटारले की ‘दादा’ घाबरतात!

0
20240105_142805

दिल्लीने डोळे वटारले की ‘दादा’ घाबरतात!

शिर्डी, दि. ५ जानेवारी ;

मी अजित पवार यांच्या विरोधात बोलावं असं अनेकाना वाटतं पण मी त्यांच्या विरोधात बोलणार नाही. जो गरीब आहे, लाचार आहे, त्याच्याशी आपल्याला लढायचं नाही तर आपल्यापेक्षा वरचढ असलेल्या लोकांशी आपली लढाई आहे. दिल्लीत बसलेल्यांशी आपल्याला संघर्ष करायचा आहे. आपली लढाई यांच्याशी नाही कारण, दिल्लीने डोळे वटारले के ते घाबरतात असा हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डी येथे ज्योत निष्ठेची-लोकशाहीच्या संरक्षणाची अंतर्गत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन दिवसीय शिबिराच्या अंतिम दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा,खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझ्यावर ईडी, सीबीआय नसल्यामुळं मला दादांसारखी दिल्लेश्वरांची भीती वाटत नाही. मेरी इनानदारी मेरी ताकद आहे. स्वत:च्या कर्तृत्वावर आमच्या आजी तेव्हा पुणे बोर्डावर निवडणून आल्या होत्या. तेव्हा त्यांच्यामागे कुठला राजकीय वारसा नव्हता. ३८ व्या वर्षी स्वत:च्या हिमतीवर शरद पवार मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांच्यामागे माझ्या आणि अजितदादांसारखी घराणेशाही नव्हती.

यशवंतराव चव्हाण यांची भूमिका भाजपला आणि आरएसएसला पुरक नव्हती. त्यांचं आणि आरएसएसचे कधी जमलं नाही. मात्र आज यशवंतराव चव्हाणाचा आदर्श सांगणारे भाजपच्या वळचणीला गेले, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

देशात दडपशाहीचे वातावरण..

पुढील काळात अनेक गोष्टी होणार आहेत. प्रचंड भपकेबाजपणा समोरच्या बाजूला दिसणार आहे. त्यांचं सरकार असल्यामुळे सरकारचं व्यासपीठ हे पक्षाचं व्यासपीठ असं समजून ते देशात राज्यात वागताहेत पण त्यांच्या भपकेबाजीला घाबरु नका कारण सत्ता असते तेव्हा असा फुगवटा असतो असे शिबिराच्या अंतिम दिवशी मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील म्हणाले की, हा फुगवटा त्यांच्या विजयासाठी नाहीतर कोण निवडून येणार आहे त्याचा अंदाज घेण्यासाठी असतो, त्यामुळे आपण ठामपणे निर्णय घेऊन काम करणं सुरु केलं पाहिजे. सध्या दडपशाहीचं वातावरण असून संसदरत्नांवर कारवाई झाली आहे. संसदेच्या सुरक्षेप्रकरणी आवाज उठवल्याने देशातले १४३ खासदारांना सत्ताधाऱ्यांनी घरी पाठवलं आहे. सुरक्षेच्या प्रश्नावरुन चर्चेची मागणी केली हा त्यांचा गुन्हा काय? चर्चा होऊ द्यायचीच नाही असं चालवलं जात आहे. देशात कधीच अशी निलंबनाची कारवाई झाली नव्हती पण आता निलंबन करायचं आणि सरकार चालवायचं ही नवी पद्धत सुरु झाली असल्याचंही हल्लाबोल जयंत पाटील यांनी मोदी सरकारवर केला आहे जयंत पाटील म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *