Ads

-

‘समृद्धी’ अपघातातील मृतांच्या कुटुंबांना २५ लाख द्या.

By Xtralarge News

December 13, 2023 3:21 pm

Ads

‘समृद्धी’ अपघातातील मृतांच्या कुटुंबांना २५ लाख द्या.

 

नागपूर, दि. १३ डिसेंबर;

समृद्धी महामार्गावर एक जुलै रोजी झालेल्या भयावह अपघातातील मृतांच्या कुटंबियांना २५ लाख रुपये मदत द्यावी अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज सभागृहात केली.

सभागृहात पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे समृद्धी महामार्गावर होत असलेल्या अपघातांच्या अनुषंगाने विषय उपस्थित केला होता.

विरोधी पक्षनेते वडेट्टीवार म्हणाले, १ जुलै २०२३ रोजी समृद्धी महामार्गावर भयावह अपघात झाला. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येकी 25 लाख रुपये देण्याची घोषणा केली. मात्र प्रत्यक्षात केंद्राकडील दोन लाख रुपये आणि राज्य सरकारचे पाच लाख रुपये असे केवळ सात लाख रुपये देण्यात आले. मृतांच्या कुटुंबियांनी भेट घेतल्यानंतर त्यांच्या वेदना समजून घेतल्या डोळ्यात पाणी आलं. पंचवीस जणाचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपये मदतीची घोषणा करत असाल आणि फक्त सात लाख रुपये मिळत असतील तर त्याचा काय उपयोग असा संतप्त सवाल करत मृतांच्या कटुंबीयांना पंचवीस लाख रुपयाची मदत देण्यात यावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

No comments to show.

Leave a Comment