Ads

---

मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी न करना…

By Xtralarge News

September 6, 2020 2:04 pm

Ads

मुंबई, दि. ६ सप्टेंबर २०२०:

बॉलिवूडची बोलबचन अभिनेत्री कंगणा राणावत व शिवसेना यांच्यातील शाब्दिक हल्लाबोल अजून तरी थांबलेला दिसत नाही. मुंबई पोलीस, मुंबई शहर व महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगणावर शिवसेनेसह राज्यातील इतर पक्ष, संघटना, बॉलिवूड व मराठी कलारांनीही तीला झापले होते. भारतीय जनता पक्षानेही मुंबई, महाराष्ट्रासंदर्भातील कंगणाच्या वक्तव्यापासून दोन हात दूरच राहणे पसंत केले. पण कंगणा काही वादग्रस्त ट्विट करायची थांबलेली नाही.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगणाचे चांगलेच वाभाडे काढले होते. त्यावर कंगणानेही पलटवार केले. हा वाद थांबेल असे वाटत असतानाच संजय राऊत यांनी एक ट्विट करत कंगणाचे नाव न घेता सुचक इशारा दिला आहे.“मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी न करना, पहले भी कई तूफानों का रुख मोड चुका हूँ”. असे हे ट्विट असून हा कंगनालाच इशारा आहे.

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगणाची अहमदाबादला मिनी पाकिस्तान म्हणण्याची हिंमत आहे का? असा सवाल राऊत यांनी केला. मुंबई आमची आई आहे, मुंबादेवी आमची आई आहे. मुंबईत खाऊन-पिऊन कमाई करून जर मुंबईबद्दल कोणी अपशब्द वापरत असेल तर आम्ही कसे ऐकून घेणार? असा सवाल त्यांनी केला. कंगणाने आधी मुंबई आणि मराठी माणसांची माफी मागितली पाहिजे, असेही ते म्हणाले.

No comments to show.

Leave a Comment