Ads

खारघरचे ‘रामशेठ ठाकूर’ सर्वोत्कृष्ट ज्युनियर कॉलेज!

By Xtralarge News

December 5, 2023 3:39 pm

Ads

खारघरचे ‘रामशेठ ठाकूर’ सर्वोत्कृष्ट ज्युनियर कॉलेज!

मुंबई, दि. ५ डिसेंबर:

महाराष्ट्र सरकार, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग यांच्या सहकार्याने ESFE द्वारे खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाला सर्वोत्कृष्ट ज्युनियर कॉलेजचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या पुरस्काराने रामशेठ ठाकूर काॅलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

बीकेसी एमएमआरडीए मैदानावर हा पुरस्कार सोहळा पार पडला. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य डॉ. निशा नायर, वरिष्ठ शिक्षिका स्वप्ना भांडवलकर व महेंद्र पाटील उपस्थित होते.


“भारतातील विविध राज्यांतील शिक्षणतज्ज्ञ आणि संस्थांना गुणवत्तेच्या आधारावर पुरस्कार देण्यात आले. अशा नामांकित व्यासपीठावर रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाला सर्वोतकृष्ठ कनिष्ठ महाविद्यालयचा पुरस्कार मिळणे हा खरोखरच अभिमानाचा क्षण आहे. काॅलेज व्यवस्थापन, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या संस्थेशी संबंधित पालकांसाठी हा खरोखरच एक शुभ आणि अभिमानाचा क्षण आहे”.

काॅलेजला पुरस्कार मिळाल्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन रामशेठ ठाकूर, संस्थेचे उपाध्यक्ष वाय. टी. देशमुख, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, मंडळाचे सदस्य संजय भगत यांनी स्वांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

No comments to show.

Leave a Comment