Ads

--

धर्मनिरपेक्ष विचार घेऊन स्वच्छ भूमिका घेतली.

By Xtralarge News

November 30, 2023 11:35 am

Ads

धर्मनिरपेक्ष विचार घेऊन स्वच्छ भूमिका घेतली.

कर्जत दि. ३० नोव्हेंबर –

महाराष्ट्रात मजबूतीने पक्षाला उभे करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा असून अजितदादांच्या नेतृत्वाखाली होणारे विचार शिबीर हे देशाच्या राजकारणात झंझावात उभा केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी कर्जत येथील निर्धार सभेत व्यक्त केला.

दादा तुम्ही काम केले नसते तर आज ४३ आमदारांची ताकद आपल्या पाठीशी उभे राहिले नसती. धर्मनिरपेक्ष विचार घेऊन आम्ही स्वच्छ भूमिका घेतली आहे. आम्हाला विकसित महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे असा शब्दही सुनिल तटकरे यांनी दिला.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्याला सामोरे जायचे आहे. आरक्षणापासून मौलाना आझाद अल्पसंख्याक विकास महामंडळासाठी जो निधी देऊन सर्वधर्मसमभाव ठेवून महायुतीच्या माध्यमातून काम करत आहोत.

जो निर्णय घेतला आहात त्यापाठीशी राज्यातील जनता उभी राहिली आहे. या मतदारसंघात उरलेल्या मतदारसंघापेक्षा हा पुढे असेल असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. १९८४ मध्ये युवक अध्यक्ष म्हणून आलो होतो. ४० वर्षात जे घडले नाही ते आज कर्जतवासियांनी करुन दाखवले हेही आवर्जून सुनिल तटकरे यांनी सांगितले.

No comments to show.

Leave a Comment