Ads

--

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना किटचे वाटप.

By Xtralarge News

November 14, 2023 12:02 pm

Ads

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना किटचे वाटप.

मुंबई दि. १४ नोव्हेंबर –

राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या दुःखाचा भार हलका झाला आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना विविध शेती आणि संसार उपयोगी साहित्यांचे किट वाटप केले जात आहे.

धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार कृषीमंत्रालय अंतर्गत महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाने यामध्ये पुढाकार घेतला असून “शेतकरी कुटुंबास मदतीचा हात-संवेदन २०२३” असे या उपक्रमाचे नामकरण करण्यात आले आहे.

या किटमध्ये परसबागेतील भाजीपाला बियाणे, नॅनो युरिया,सूक्ष्म मूलद्रव्य तसेच विविध किटकनाशकांचा समावेश आहे. त्याचबरोबर दिवाळी फराळसाठी उपयुक्त साहित्य आणि महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळातर्फे उत्पादीत करण्यात येत असणाऱ्या विविध वस्तूंचा समावेश आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यातील २००० शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना हे किट वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमाचा याप्रमाणे याचे सर्व जिल्ह्यात याचे वितरण होणार आहे. ही किट पूर्णपणे लोकवर्गणीतून देण्यात आली आहे, यामध्ये शासनाचा कोणताही निधी वापरण्यात आलेला नाही.

परळी येथे नुकत्याच एका आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात कीट देण्यात आले.

No comments to show.

Leave a Comment