NCP प्रकरणी ३१ जानेवारीपर्यंत निकाल द्या..
NCP प्रकरणी ३१ जानेवारीपर्यंत निकाल द्या..
दिल्ली, दि.३० ऑक्टोंबर:
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार अपात्र प्रकरणात 31 जानेवारीपर्यंत निकाल देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. महाराष्ट्राचे ट्रीपल इंजिन सरकार सुट्ट्यांचे कारण देऊन आमदार अपात्र प्रकरणात पळपुटेपणा करत होती. राज्यात पॅालिसी पॅरालिसीस आहे. त्यांना मोठी चपराक आहे. आम्हाला न्याय नक्की मिळेल. सत्यमेव जयते असे प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी नवी दिल्ली येथे प्रसार माध्यमांची बोलताना दिली.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आज ज्या पद्धतीने काही ना काहीतरी कारण काढून महाराष्ट्राचे ट्रिपल इंजिन खोके सरकार हे पळकुटेपणा करत होत. सुट्ट्यांचे कारण सांगून हे प्रकरण लांबवण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. राज्य महाराष्ट्रमध्ये पॉलिसी पारालिसिस आहे. या सरकारमध्ये काम कोणीच करताना दिसत नाही आहे. तुम्ही बघता महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने कोर्टाने आम्हाला न्याय दिलेला आहे. मी कोर्टाचे मनःपूर्वक आभार मानते.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, आज माझी मुलगी देखील माझ्यासोबत होती योगायोगाने माझ्या मुलीचा वाढदिवस आहे. कारण तिला तिचा वाढदिवस तिच्या आईबरोबर साजरा करायचा होता. पण मी तिला म्हणाले होते की मी कोर्टात जाणार आहे, त्याच्यामुळे माझी मुलगी सुप्रीम कोर्टात माझ्यासोबत आली होती आणि एका अर्थी मला अभिमान वाटतो की मुलगी नको ना असं वाटणाऱ्या समाजामध्ये आज मुली पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. मुलींमध्येही मुलांन इतकी ताकद असते हे आज तुम्ही सगळे बघतात असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
