Ads

--

सत्ताधाऱ्यांना मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी वाटते

By Xtralarge News

October 15, 2023 10:21 pm

Ads

सत्ताधाऱ्यांना मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी वाटते…

 

मुंबई, दि. १५ ऑक्टोबर :-

मुंबईने आलेल्या प्रत्येकाला आधार दिलेला आहे. आर्थिक राजधानी म्हणून देशाच्या जडणघडणीत मुलाचे योगदान दिलेले आहे. मात्र सत्ताधाऱ्यांना मुंबई सोन्याचे अंड देणारी कोंबडी वाटते. मराठी माणसाचा या मुंबईवर प्रचंड जीव आहे. पण मराठी माणसाच्या हातातून मुंबई काढून घ्यायची हा डाव आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयाच्या आवारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई विभागीतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. यावेळी पक्षाच्या मुंबई विभाग अध्यक्ष पदी मनपा गटनेत्या राखी जाधव यांची रितसर निवड करण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलत होते.

 

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, निष्ठावंत कार्यकर्त्यांचा पक्षाने नेहमीच सन्मान केलेला आहे. राखी जाधव पक्षाच्या पडत्या काळात खंबीरपणे उभ्या राहिल्या. नवाब मलिकांच्या अनुपस्थितीत त्यांनी पक्षाने सोपवलेल्या सर्व जबाबदाऱ्या सामर्थ्याने पेलल्या. या नव्या जबाबदारीला देखील त्या योग्य न्याय देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

मुंबईने आलेल्या प्रत्येकाला आधार दिलेला आहे. आर्थिक राजधानी म्हणून देशाच्या जडणघडणीत मुलाचे योगदान दिलेले आहे. मात्र सत्ताधाऱ्यांना मुंबई सोन्याचे अंड देणारी कोंबडी वाटते. मराठी माणसाचा या मुंबईवर प्रचंड जीव आहे. पण मराठी माणसाच्या हातातून मुंबई काढून घ्यायची हा डाव आहे. मुंबईतील अनेक महत्त्वाच्या गोष्टी शेजारच्या राज्यात नेण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे. मुंबईच्या सुशोभीकरणाच्या नावावर मुंबई महानगरपालिकेच्या ठेवी वापरल्या जात आहे. दरम्यान त्यांनी राज्यातील शासकीय रुग्णालयांची अवस्था भयावह आहे. किड्यामुग्यांसारखे निष्पाप लोकांचे जीव जात आहेत म्हणत राज्यातील ढासळलेल्या आरोग्य यंत्रणेवर भाष्य केले.

 

मागील २ वर्षांपासून बऱ्याच महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. आज शहरात कचऱ्याचे, पाण्याचे, ड्रेनेजचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. आपल्याला याबाबतीत लोकांना जागृत करावे लागेल. आपल्याला आप आपसातले वाद संपवून एकत्र येऊन काम करायला पाहिजे. सरकारचा भोंगळ कारभाराचा भांडाफोड करायला पाहिजे. आघाडी सरकार असताना आपण केलेली कामे लोकांसमोर मांडली पाहिजे. एक वेळ होती या मुंबई शहरात आपले जवळपास ४ आमदार होते व एक खासदार होता मात्र आता तशी परिस्थिती राहिली नाही. आपल्याला पुन्हा आपले गतवैभव प्राप्त करायचे आहे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

No comments to show.

Leave a Comment