खरी राष्ट्रवादी कुणाची हे जनतेला माहिती आहे!

0
IMG-20230624-WA0069

खरी राष्ट्रवादी कुणाची हे जनतेला माहिती आहे!

मुंबई, दि.१५ ऑक्टोबर ;

सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात राज्यात काम करत आहे. पक्षातून बाहेर गेलेल्या काही लोकांनी दिल्लीच्या कोर्टात आपल्याला नेले आहे. पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. काही लोक पक्षावर दावा करत न्‍यायालयात गेले आहेत. त्‍यामुळे खऱ्या राष्ट्रवादीवर आता न्‍यायालयात संघर्ष करण्याची वेळ आली आहे. आता हे लोक निवडणूक आयोगात पक्ष, चिन्हावर दावा करत आहेत. पण खरी राष्ट्रवादी कोणाची हे जनतेला माहित आहे असे शरद पवार म्हणाले.

 

मुंबईतील कार्यकर्त्या मेळाव्यात शरद पवार मार्गदर्शन करताना म्हणाले की, दोन तीन दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात वाचले की, कधीकाळी आपल्यासोबत काम करणाऱ्या लोकांनी वेगळा रस्ता स्वीकारला आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या अध्यक्षांची निवड केली. पण फरक फक्त एवढाच आहे की, तुम्ही ज्यांची निवड केली ते तुरुंगात कधी गेले नव्हते. आता दुसऱ्या बाजूचे किती गेले ते मला माहीत नाही, असा टोला लगावत शरद पवार म्हणाले की, तुम्हाला सर्वांना तो इतिहास माहीत आहे. आजचा दिवस हा समाधान व्यक्त करण्याचा दिवस आहे. कारण काल झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात भारताला सामना जिंकवून देण्यात मुंबईच्या खेळाडूंचा मोठा वाटा आहे. त्यामुळे आपण सगळे जण आनंदी आहोत. आज पक्षाची ही बैठक नवीन रस्ता देणारी, आत्मविश्वास वाढवणारी असल्याने याचा मला आनंद आहे.

 

राज्यात आपलं सरकार गेलं पण तुम्ही लक्षात घ्या देशभरात भाजपसोबत जे लोक आहेत त्यांच्यासोबत इतर लोक जावू इच्छीत नाहीत. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार होत पण नंतर आमदार फुटले. दिल्ली, पंजाब, उत्तराखंड, झारखंड, पश्चिम बंगाल कोणत्या राज्यात भाजपा आहे? यावेळी असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला. भाजपा देशात दिवसेंदिवस कमी होत आहे हे चित्र आता सिद्ध होत आहे. सत्तेचा गैरवापर होत आहे.

 

भाजपा देशात दिवसेंदिवस कमी होत आहे हे चित्र आता सिद्ध होत आहे. सत्तेचा गैरवापर होत आहे. सत्ता ही लोकांसाठी असते. केंद्र सरकारचे निर्णय सामान्य लोकांच्या फायद्याचा नाही. राज्‍य सरकारने कंत्राटी पोलीस भरतीचा निर्णय घेतला आहे. पाेलीस खात्‍यामध्‍ये सर्व जातींना व महिलांना प्रतिनिधित्‍व मिळायला हवे. मात्र कंत्राटी भरतीमुळे सरकार या उद्‍देशाच हारताळ फासत आहे. त्‍यामुळे कंत्राटी पद्धतीची पोलीस भरती चुकीची आहे. काही नोकरी ११ महिन्यांची आहे. ११ महिने काम केल्यावर पुढे काय करायचे? असा प्रश्न देखील शरद पवार यांनी उपस्थित केला आहे.

 

 

विधीमंडळात पावसाळी अधिवेशनाच्यावेळी विचारलेल्या प्रश्नात माजी मंत्र्यांनी १९ हजार ५५३ मुली आणि महिला बेपत्ता झाल्याची माहिती दिली. एवढ्या महिला आणि मुली गायब आहेत, त्यांच्या घरच्यांची काय अवस्था असेल. ज्या महिला आणि मुली बेपत्ता आहे, त्यांची काय अवस्था असेल. त्यामुळे राज्यातील महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न देखील आता ऐरणीवर आला आहे. हे सरकार त्यांच्यासाठी काहीच करत नाहीये, त्यामुळे हे सरकार बदलण्याची भूमिका आता आपल्याला घेणे गरजेचे आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये मुंबई अध्यक्षपदी राखीताई जाधव यांची निवड करण्यात आली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *