दुष्काळाच्या झळा सरकारला माहित आहेत का?
मुंबई, दि, २१ सप्टेंबर :
राज्यात गेल्या अडीच महिन्यांमध्ये अत्यंत कमी पाऊस पडला आहे. हीच परिस्थिती राहीली तर आगामी काळात दुष्काळाचं मोठं संकट महाराष्ट्रावर येऊ शकतं ही शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्यात १ जानेवारी ते ३१ जुलै पर्यंत तब्बल १ हजार ५५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.राज्यात शेतकरी आत्महत्या करून आपलं जीवन संपवत आहेत. यापरिस्थितीवरून वडेट्टीवार यांनी राज्यसरकारवार निशाणा साधत महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा किती तीव्र आहे याची माहिती सरकारला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित करत फक्त आश्वासन देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून मोकळं व्हायचं हाच महायुती सरकारचा पॅटर्न असल्याची खरमरीत टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
महायुती सरकारवर वडेट्टीवार यांनी ट्विट करत हल्लाबोल चढवला आहे. त्यात ते म्हणतात, दुष्काळी संकट आणि सरकारच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याचे अहवाल पुढे आले आहे. यानुसार राज्यात १ जानेवारी ते ३१ जुलै पर्यंत तब्बल १ हजार ५५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून यात अमरावती विभागात सगळ्यात जास्त ६३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. यात अमरावतीत १८३,बुलढाणा १७३, यवतमाळ १४९,अकोला ९४, वाशीम ३८ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. औरंगाबाद विभागात ५८४ शेतकऱयांनी आत्महत्या केली यात बीडमध्ये १५५, उस्मानाबाद १०२, नांदेड ९९,औरंगाबाद ८६,परभणी ५१,जालना ३६, लातूर ३५,हिंगोलीत २० शेतकऱ्यांनी आपल जीवन संपवल आहे. तर नागपूर विभागात १४४ शेतकरी आत्महत्या केल्या यात चंद्रपूर ७३,वर्धा ५०,नागपूर १३,भंडारा ५ आणि गोंदिया ३ शेतकरयांनी आपली जीवनयात्रा संपवली.नाशिक विभागात १७४ शेतकरी आत्महत्या केल्या यात जळगावमध्ये ९३, अहमदनगरमध्ये ४३, धुळे २८, नाशिक ७ , नंदुरबारमध्ये ३ शेतकऱयांनी आत्महत्या केल्या आहेत. पुणे विभागात १६ शेतकऱयांनी आत्महत्या केल्या यात सोलापूर १३, सातारा २, सांगलीत एका शेतकऱयांनी आत्महत्या केली आहे. सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या जून महिन्यात झाल्या आहेत. जानेवारीत २२६ , फेब्रुवारी १९२ ,मार्च २२६ ,एप्रिल २२५, मे २२४, जून २३३, जुलै २२९ शेतकऱयांनी आत्महत्या केल्या आहेत. यावरून विजय वडेट्टीवार यांनी तीव्र संताप व्यक्त करत ट्रिपल इंजिन सरकारवर निशाणा साधला आहे.
वडेट्टीवार म्हणाले, राज्यातील अहमदनगर जिल्ह्यात सरासरी ४५ टक्के कमी पाऊस झाला आहे. सांगलीतही सरासरी ४५ टक्के कमी पाऊस झाला आहे.नांदेडमध्ये सरासरीच्या १९ टक्के कमी पाऊस. सोलापुर सरासरीच्या ३५ टक्के कमी पाऊस, सातारा सरासरीच्या ४० टक्के कमी,छत्रपती_संभाजीनगर सरासरी २७ टक्के कमी, जालना सरासरीच्या ४३ टक्के कमी,बीडमध्ये सरासरीच्या ४३ टक्के कमी, धाराशिवमध्ये सरासरीच्या ३२ टक्के कमी, परभणी सरासरीच्या ३१ टक्के कमी,अमरावती सरासरीच्या ३० टक्के कमी, वाशिम सरासरीच्या २२ टक्के कमी, अकोला सरासरीच्या २९ टक्के कमी पाऊस झाला आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या जून महिन्यात झाल्या आहेत. जानेवारीत २२६ , फेब्रुवारी १९२ ,मार्च २२६ ,एप्रिल २२५, मे २२४, जून २३३, जुलै २२९ शेतकऱयांनी आत्महत्या केल्या आहेत. यावरून विजय वडेट्टीवार यांनी तीव्र संताप व्यक्त करत ट्रिपल इंजिन सरकार मात्र आपल्याला काय ? आपल्याला फक्त आश्वासन देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून मोकळं व्हायचं आहे, हाच पॅटर्न सरकार चालवताना महायुतीने हाती घेतला असल्याची घणाघाती टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.