images - 2023-09-07T190021.872

‘दहीहंडी’ जागतिक आकर्षण बनू दे !

मुंबई, दि. ७ सप्टेंबर ;

भगवान श्रीकृष्णांची जन्माष्टमी साजरी करण्यासाठी आपल्याकडे ‘दहीहंडीची’ परंपरा आहे, ही साजरी करण्यासाठी हिंदू बांधवांना कधी संघर्ष करावा लागेल असं वाटलंच नव्हतं. पण ते काही वर्षांपूर्वी सुरु झालं. ह्या संघर्षात महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरुद्ध सरकार अशी लढाई झाली पण आम्ही निकराची लढाई केली. हिंदू सणांसाठी आणि मराठी मनांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायम उभी आहे आणि राहील. कृष्ण जन्म उत्साहाने साजरा होऊ दे आणि दहीहंडी हे जागतिक आकर्षण बनू दे अशा शुभेच्छा मनसे अध्यक्ष

राज ठाकरे यांनी दिल्या आहेत.

 

 

राज ठाकरे पुढे म्हणतात की,सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम जनतेला कृष्ण जन्माच्या शुभेच्छा. भारतीय परंपरेतल्या अनेक महापुरूषांच आपल्या मनावर शतकानुशतकं गारुड आहे, पण त्यातला भगवान श्रीकृष्णांचे गारुड हे मात्र अतुलनीय आहे. ते देशाच्या सीमा ओलांडून कधीच निसटून गेलं आहे. आज जगभरात कृष्णभक्ती करणाऱ्यांचा पंथ हा प्रचंड मोठा आहे.

भगवान श्रीकृष्णांच्या आयुष्यातील सगळे टप्पे हे उत्कटतेने भरलेले, पण तरीही ते कशातच अडकले नाहीत. जगातील सर्वोच्च तत्वज्ञान मांडलं, वेळेस योद्धा झाले, पण सत्ताधीश होण्याची महत्वकांक्षा नाही. द्वारकाधीश झाले पण सुदाम्याला विसरले नाहीत. धुरंधर राजकारण केलं पण कलासक्तता कधी सोडली नाही. आणि वेळेस सगळ्याचा त्याग करून जंगलात तपश्चर्येला जाऊन बसले. इतके कंगोरे असलेला महापुरुष जगाच्या इतिहासात सापडणार नाही आणि म्हणूनच जगाला कृष्णाची भुरळ पडली नसती तर आश्चर्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *