Ads

---

शरद पवारांनी संभ्रम दूर करावा!

By Xtralarge News

August 14, 2023 5:08 pm

Ads

शरद पवारांनी संभ्रम दूर करावा!

मुंबई दि. १४ ऑगस्ट;

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यातील भेटीमुळे जनतेमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये. महाविकास आघाडी एकत्र आहे, लोक आमच्याकडे एकत्र बघतात, कोणताही संभ्रम होऊ नये अशी आमची धारणा आहे. त्यामुळे या विषयांवर लवकर भूमिका स्पष्ट झाली पाहिजे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हणाले.

शरद पवार व अजित भेटीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेतली. जवळपास अडीच तास चाललेल्या या बैठकीत भेटीवर चर्चा झाल्याचे समजते.

या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत इंडिया आघाडीची बैठक आहे. या बैठकीच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा झाली.राज्यातील राजकीय परिस्थितीवरही सविस्तर चर्चा झाली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल जो गैरसमज पसरला जात आहे त्यावरही यावेळी चर्चा झाली.

No comments to show.

Leave a Comment