द्वेश व जातीवादाचा मोठा ठेकेदार दिल्लीत !
द्वेश व जातीवादाचा मोठा ठेकेदार दिल्लीत !
मुंबई , दि ३१ जुलै ;
द्वेष आणि जातीवादाची जी दुकान आहेत आणि त्या व्यापाराचा जो सर्वात मोठा ठेकेदार दिल्लीत बसून स्वत:ला प्रधान सेवक म्हणवतो त्यांना मी सांगू इच्छितो की 2002 गुजरात हिंसाचार घडल्यावर सोनिया गांधी यांनी तुम्हाला जे नाव दिले होते ते जाता जाता खरे करू नका, असा गर्भित इशारा वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदींचे नाव न घेता दिला आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, अच्छे दिनच्या नावाखाली भाजपने कायम धार्मिक ध्रुवीकरण आणि ब्राह्मणवादाला खतपाणी घालण्याचे काम केले आहे, ज्यामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्यांक समूहाच्या विरोधात द्वेषातून केले जाणारे गुन्हे वाढले आहेत.
The Merchant of Death and Hate ने जातीय संहाराचे (ethnic cleansing) 2002 चे गुजरात नरसंहार मॉडेल ज्याने भाजपा-आरएसएस ला केंद्रात सत्तेत बसवले तेच मॉडेल ईशान्य भारतात आयात केले आहे.
मणिपूर मध्ये सुरू असलेला हिंसाचार बघितला तर लक्षात येते की गुजरात मधील २००२ हिंसाचाराशी बरेच साधर्म्य आहे. जसे की राज्य प्रायोजित हिंसाचार, संघर्ष जास्त काळ सुरू ठेवणे, नरसंहार, महिलांवर बीभत्स अत्याचार करणे, विटंबना करणे इत्यादी सुरू आहे असे आंबेडकर म्हणाले.
