देवेंद्र फडणवीसांविषयी जनतेच्या मनात विश्वास.
मुंबई, दि. २३ जुलै :-
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आणि महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मागाठाणे विधानसभा क्षेत्रातभाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या संकल्पनेतून ‘भव्य रक्तदान शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. राज्यात सर्वत्र अशा प्रकारचे कार्यक्रम राबविले जात असून जनतेच्या मनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी विश्वास आहे, असे प्रतिपादन यावेळी आ. दरेकर यांनी केले.
दरेकर म्हणाले की, आज संपूर्ण राज्यभर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने सेवा दिन म्हणून साजरा केला जातोय. नेत्यांचा वाढदिवस म्हणजे मोठमोठे बॅनर, वर्तमानपत्रात-टीव्हीवर जाहिरात, यापद्धतीने साजरा केला जातो. परंतु आपले नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले माझ्या वाढदिवसानिमित्ताने जाहिराती देऊ नये, बॅनर लावू नये. सेवाभावी भावनेतून लोकांसाठी सेवाभावी उपक्रम झाले पाहिजेत, अशा प्रकारचा संदेश दिला. आज संपूर्ण राज्यभर वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होताहेत हेच आपल्या नेत्याचे मोठेपण आहे.
एका बाजूला लोकांना पब्लिसिटीची हाव असते, परंतु दुसऱ्या बाजूला माझ्या कार्यकर्त्याने माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने लोकांची सेवा केली पाहिजे हा गुण आपल्या नेतृत्वात आहे. आपले कुटुंबप्रमुख देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घालून दिलेला हा आदर्श आहे. पंतप्रधान म्हणून काम करताना मी प्रधानसेवक आहे. सेवा परम धर्म हा आपल्याला विचार दिलाय. त्यामुळे सेवा करा तेच खरे काम व भुमिका असल्याचे आपले नेतृत्व आपल्याला सांगत असल्याचे दरेकर म्हणाले.
पक्षाने एक कार्यक्रम दिला की मागाठाणेतील आपले सर्व पदाधिकारी तो अत्यंत चांगल्या प्रकारे राबवितात. आजही रक्तदान शिबिरासारखा पवित्र कार्यक्रम आपण केलात. राज्यात अशाच प्रकारचे कार्यक्रम होताहेत. ज्या-ज्या ठिकाणी जातो तेथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी लोकांच्या मनात विश्वास आहे. असा एक घटक उपेक्षित नाही की त्या घटकाला आपण काही दिले नाही. महाराष्ट्रात अनेक नेते आहेत परंतु सर्वात लोकप्रिय नेता कोणी असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात देवेंद्र फडणवीस काम करत आहेत व जनतेला खऱ्या अर्थाने विश्वास आणि विकास देण्याचा प्रयत्न करत असल्याचेही दरेकर म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने आ. दरेकरांच्या हस्ते वरळी येथे सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार, पोलीस कॅम्पमधील नागरिकांना छत्री वाटप आणि धारावी येथील नागरिकांना धान्य वाटप करण्यात आले.
Leave a Comment