Ads

-

इरशाळवाडी दुर्घटनाग्रस्तांची मंत्री अदिती तटकरेंकडून चौकशी..

By Xtralarge News

July 20, 2023 11:09 am

Ads

इरशाळवाडी दुर्घटनाग्रस्तांची मंत्री अदिती तटकरेंकडून चौकशी..

 

मुंबई, दि. २० जुलै :

खालापूर जवळील इरशाळ वाडी येथे दरड कोसून जखमी झालेल्या नागरिकांवर कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असून महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज सकाळी या रुग्णांची भेट घेत विचारपूस केली. जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च शासन करणार आहे.

रुग्णांवर योग्य उपचार करण्यात यावे आणि या दुर्घटनेतील अजून जखमी नागरिक रुग्णालयात आल्यास प्रशासनाने सज्ज असावे यासाठी डॉक्टरांशी चर्चा केली.

यावेळी एमजीएम चे डॉ. सागर, पनवेल महापालिकेचे डॉ. गोसावी नायब तहसीलदार पनवेल श्री. लाचके उपस्थित होते. या दुर्घटनेत मृत पावलेल्या कुटुंबांना शासन पाच लाखांची मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. इथे सुरू असलेल्या बचाव कार्यावर मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री स्वतः लक्ष देऊन आहेत.

 

No comments to show.

Leave a Comment