Ads

--

सोमय्यांच्या ‘तसल्या’ VDO ने अधिवेशन तापले !

By Xtralarge News

July 18, 2023 11:25 pm

Ads

सोमय्यांच्या ‘तसल्या’ VDO ने अधिवेशन तापले !

मुंबई, दि. १८ जुलै ;

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणांची भीती दाखवून महिला अधिकाऱ्यांना धमकी देत आहे. या महिलांची पिळवणूक व शोषण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओची चौकशी करावी व त्यांना असलेली केंद्र सरकार पुरवत असलेली सुरक्षा काढून घ्यावी अशी मागणी विधान परिषदेची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

सोमय्यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओत मराठी स्त्रियांविषयी अश्लील भाषेत संभाषण आहे, याचा तपास करावा. मराठी महिलांविषयी अशा शब्दांत संभाषण करणारे किरीट सोमय्या हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रद्रोही आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर यांच्या महाराष्ट्रातील संस्कृतीला छेद देण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. महामंडळांवर, विविध पदांचा प्रलोभने दाखवून महिलांचे शोषण केले जात आहे, या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करत दानवे यांनी आक्षेपार्ह व्हिडिओचा पेनड्राईव्ह उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याकडे दिला. त्यावर उत्तर देताना गृहमंत्री फडणवीस यांनी या गंभीर प्रकरणाची सखोल वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

 

No comments to show.

Leave a Comment