राज्याच्या तिजोरीच्या चाव्या अजितदादांकडेच !

0
images (34)

राज्याच्या तिजोरीच्या चाव्या अजितदादांकडेच !

मुंबई, दि. १४ जुलै :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत सहभागी झाला तरी खाते वाटपावरून १२ दिवस बैठका मागून बैठका झाल्या. अर्थ खाते हा कळीचा व वादाचा मुद्दा होता पण दादा मागे हटले नाहीत. अर्थ खात्यासह महत्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याकडेच खेचून आणली. शिंदे शिवसेनेने अर्थ खाते अजित पवारांना विरोध दर्शवला पण त्यांचा विरोध कामी आला नाही आणि आथा पुन्हा अजिथ पवार यांच्याकडेच अर्थखाते आले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्याच्या वित्त व नियोजन विभागाच्या मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली, तत्पूर्वी सकाळी त्यांनी दोन्ही विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेऊन वित्त व नियोजन विभागाच्या सद्यस्थितीची माहिती तसेच कामकाजाचा आढावा घेतला. अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, अतिरिक्त मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील त्यांच्या दालनातून कामकाजाला सुरुवात केली. सकाळी लवकर मंत्रालयात आलेल्या अजित पवार यांनी वित्त व नियोजन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर ते अभ्यागत नागरिकांना भेटले. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांचे कार्यालय मंत्रालयातील पाचव्या मजल्यावरील ५०३ क्रमांकाच्या दालनात असून या दालनातूनच आपल्या विभागांचे तसेच उपमुख्यमंत्रीपदाचे कामकाज अजित पवार पाहणार आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *