Ads

--

भाजपाचे टार्गेट फिक्स, विधानसभा १५२ व लोकसभा ४५ !

By Xtralarge News

July 13, 2023 11:15 pm

Ads

भाजपाचे टार्गेट फिक्स, विधानसभा १५२ व लोकसभा ४५ !

मुंबई, दि. २३ जुलै  ;
भारतीय जनता पक्षाने विधानसभा व लोकसभेचे टार्गेट फिक्स केले आहे.विधानसभेच्या २८८ जागांपैकी महायुतीमध्ये आम्हाला ज्या जागा मिळतील त्यापैकी ८० टक्के जागांवर विजय होईल म्हणजे १५२ जागांवर विजयी मिळवू. तर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुती २०० हून अधिक जागांवर विजयी होईल. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून एनडीएच्या ४५ हून अधिक तर देशात ३५० हून अधिक जागांवर विजयी होईल असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमधील अंजूर येथे “महाविजय २०२४ – कार्यशाळा” उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, आम्ही महाराष्ट्राचे गणित आखले आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री अजित पवार सोबत आले आहेत आम्ही सर्व जण मिळूण प्रत्येक बुथवर १०० मतांचे राजकारण करणार आहोत. सर्व समाजाला सांस्कृतिक, राजकीय, सांस्कृतिक व सर्व विषयांचे समाधान करू. १८ पगड जाती व १२ बलुतेदारांना सोबत घेणार आहोत. एका विधानसभेत ६० हजार तर लोकसभेत साडे तीन लाख घरी आम्ही पोहचणार आहोत. सत्ता आणि संघटनेच्या समन्वयातून संकल्प पूर्ण करू.’

महाराष्ट्रात भाजपाची घोडदौड प्रचंड ताकदीने सुरु राहणार आहे. पार्लियामेंट ते पंचायतपर्यंत आम्ही काम करीत असून येणाऱ्या सर्व निवडणुकीत भाजपा क्रमाक एक वर राहील आणि महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत जो आम्ही नंबर गाठला नाही तो नंबर आमची महायुती गाठेल.

भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रत्येकी ४ प्रतिनिधी अशी एकूण १२ सदस्यांची समन्वय समिती स्थापन झाली आहे. प्रसाद लाड या समितीचे प्रमुख समन्वयक असतील. निवडणुकीसाठी २८८ वॉर रूम तयार केल्या जाणार, कामाचे ऑडिट होणार, प्रत्येक बुथवर ५० पक्ष प्रवेश व्हावे यासाठी योजना आखली आहे. तर ४८ लोकसभा जागांवर ४८ विस्तारक काम करणार आहेत. भाजपाच्या सर्व आघाड्या अॅक्टिव्ह होत आहेत. मोदी सरकारने ९ वर्षांत केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी घरचलो अभियान राबविण्यात येत असल्याचे बावनकुळे म्हणाले.

No comments to show.

Leave a Comment