गट असले तरी बाबासाहेबांच्या नावाने आम्ही एकच !

0
IMG-20230712-WA0151

गट असले तरी बाबासाहेबांच्या नावाने आम्ही एकच !

मुंबई दि. १२ जुलै :-
आमचा समाज कोणाही विरुध्द नाही, आमच्या विरुध्द कोणी जावु नका. आम्ही कुणावर अन्याय करणार नाही. आमच्यावर कोणी अन्याय केला तर याद राखा, अन्याय सहन केला जाणार नाही. आमच्या समाजात गटतट आहेत. मात्र डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आम्ही सर्व एक आहोत. जयभीमच्या बुलंद आवाजाने आम्ही एक आहोत असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदीर सभागृहात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित दलित पँथर सुवर्ण महोत्सव सोहळयात रामदास आठवले बोलत होते.

आमच्याच पक्षात गट आहेत असे नाही तर इतरही पक्षात गटतट आहेत. गटबाजीमुळे इतर पक्षातील नेत्यांची एकमेकांवर होणारी आरोपांची चिखलफेक आपण पाहत आहोत, आमच्यात गटतट असले तरी  इतर पुढा-यांवर मी कधीही टीका करीत नाही असे  रामदास आठवले म्हणाले.

दलित पँथर हे आक्रमक संघटन आहे. पँथर हा सत्ता मागणारा नसतो, पँथर हा संघर्ष करणारा हवा आहे. रिपब्लिकन पक्षाशी संलग्न ठेवून पुन्हा दलित पँथर कशी स्थापन करायची आणि तिचे स्वरुप कसे असेल याबाबत विचारवंताचे मार्गदर्शन घेणार आहोत. दलित पॅंथरच्या सुवर्ण महोत्सवी सोहळयात पुन्हा दलित पँथर सुरु करा अशी मागणी पुढे आल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली.

प्रकाश आंबेडकर यांनी सर्व वंचितांना, बहुजनांना एकत्रित करण्याचा प्रयोग चांगला केलेला आहे. मात्र त्यांनी रिपब्लिकन नावाशी फारकत घेतली आहे. रिपब्लिकन हेच नाव व्यापक आहे. महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची रिपब्लिकन संकल्पना आहे. रिपब्लिकन नाव सोडुन अन्य नावाने पक्ष चालविणे चुकीचे असल्याचे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *