आता ‘खड्डे आपल्या दारी’ उपक्रम सुरू करा !

0
IMG-20230710-WA0046

आता ‘खड्डे आपल्या दारी’ उपक्रम सुरू करा !

मुंबई, दि. ११ जुलै ;

मुंबई महानगरपालिका हद्दीत पावसाळ्यात खड्डे पडणे नागरिकांना नवीन नाही, गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईमध्ये पडलेल्या मुसळधार पावसाने मुंबई महानगरपालिकेची पोलखोल केली आहे.यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ॲड. अमोल मातेले यांच्याकडून जोरदार टीका करण्यात आली आहे.

जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाने मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाची पोलखोल केल्याचे दिसते. उत्कृष्ट दर्जाचे रस्ते बनविणे सरकार आणि प्रशासनाची जबाबदारी असताना याकामी ते अपयशी झाल्याचे दिसते.मुंबईतील रस्त्यावरील खड्डे पाहून राज्य सरकार आता खड्डे आपल्या दारी हा उपक्रम राबवित असल्याची खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ॲड.अमोल मातेले यांनी शहरातील रस्त्याच्या दुरवस्थेबाबत सरकारला जाब विचारला आहे.

 

मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त करणार,अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र ही घोषणा मुंबईच्या मुसळधार पावसाच्या पाण्यात वाहून गेली की काय? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.कारण, मुंबईत पडलेल्या मुसळधार पावसानंतर मुंबईकरांनी खड्ड्याविषयी शेकडो तक्रारी महानगरपालिकेकडे केल्या आहेत. दरवर्षी मुंबई शहरातील रस्त्यांची पावसाळ्यात ही अवस्था असून रस्त्यावर पडणाऱ्या खड्डयांमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. खड्डेमय मुंबई झाल्यामुळे मुंबईकरांना कामावर पोहोचण्यासाठी दोन दोन तासांचा कालावधी घालवावा लागतोय.

 

एवढंच न्हवे तर, मुंबईच्या पावसात राज्य सरकारने व बीएमसी प्रशासनाने 96 हजार कोटीची एफडी मोडून मुंबईत केलेली नालेसफाई व गटारसफाई कुठे वाहत गेली ? असाही प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. त्यामुळे आता शासनाने ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमात बदल करून ‘खड्डे आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू करावा अशी मिश्किल टीका ॲड. मातेले प्रशासनावर केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *