अनलाॅक 4 मध्ये मिळाल्या या सवलती…..
मुंबई, 30 ऑगस्ट:
कोरोनाचे संकट संपलेले नसले तरी जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आणण्यासाठी टप्याटप्याने सवलत देण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने अनलाॅक 4 जाहीर केला असून आणखी शिथलिता देण्यात आली आहे. देशात १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर असा अनलॉकचा चौथा टप्पा असणार आहे. या टप्प्यात आणखी कोणत्या गोष्टी सुरू होणार आणि काय बंद राहणार, याची प्रतीक्षा सर्वांनाच होती.
गृहमंत्रालयाने जाहीर केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचना नुसार सार्वजनिक घडामोडींची व्याप्ती वाढवण्यात आली आहे.
शाळा आणि महाविद्यालये 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत.विद्यार्थ्यांना स्वेच्छेने शाळा-
महाविद्यालयांमध्ये जाण्याची २१ सप्टेंबरपासून परवानगी असेल. ५० टक्के शिक्षक आणि कर्मचारी वर्गाला शाळा-महाविद्यालयांमध्ये उपस्थित राहता येईल. परंतु ऑनलाइनच्या माध्यमातून अभ्यासक्रम शिकवला जाईल. कोचिंग क्लासेस बंदच राहतील.
मेट्रो सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे पण मुंबईतील लोकलबाबत अजून निर्णय झालेला नाही.
२१ सप्टेंबरपासून धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक व इतर कार्यक्रमाला १०० जणांना उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली आहे, आधी ही संख्या 50 होती. परंतु मास्क, सोशल डिस्टन्स सह इतर नियम पाळावे लागणार आहेत.
कंटेन्मेंट झोनमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊनची कठोरपणे अंमलबजावणी असेल. या झोनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता कोणतीही सवलत मिळणार नाही.
नाटय़गृहे, थिएटर, स्विमिंग पूल बंदच राहतील.
स्थानिक प्रशासन दोन-पाच दिवसांची तात्पुरती टाळेबंदी लागू करत आहे. या अनियमित टाळेबंदीला केंद्राने मनाई केली आहे. राज्याअंतर्गत आणि आंतरराज्यीय वाहतुकीस ई-पासची गरज नाही. वस्तूंची वाहतूक आणि व्यक्तींना विनाअडथळा प्रवास करता येणार आहे.
