Ads

--

राष्ट्रपतींची आदिम जनजातींप्रती संवेदना स्पृहणीय :

By Xtralarge News

July 7, 2023 11:17 am

Ads

राष्ट्रपतींची आदिम जनजातींप्रती संवेदना स्पृहणीय :

मुंबई, दि. ७ जुलै ;

द्रौपदी मुर्मू या स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती असून अनेक विक्रम त्यांच्या नावावर आहेत, असे सांगून वंचित आदिवासी तसेच आदिम जनजातींप्रती त्यांची संवेदना स्पृहणीय आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने राजभवन येथे नागरी सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते…

द्रौपदी मुर्मू यांचे जीवन अतिशय संघर्षमय होते. मुर्मू यांनी कठीण परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केले असे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आदिवासी कुटुंबात व एका लहानश्या गावात जन्मलेली मुलगी जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राची राष्ट्राध्यक्ष होणे हा भारताच्या लोकशाहीचा गौरव असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

सुरुवातीला राज्यपालांनी राष्ट्रपतींचा शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. त्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी राष्ट्रपतींना गणेशाची व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली. सांस्कृतिक कार्यक्रमानंतर राज्यपालांनी राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ स्नेहभोजन आयोजित केले. स्नेहभोजनाला राज्य मंत्रिमंडळातील अनेक सदस्य व निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.

No comments to show.

Leave a Comment