Ads

--

BMC तील २५ वर्षांच्या कामाची SIT चौकशी करा.

By Xtralarge News

June 23, 2023 11:45 pm

Ads

BMC तील २५ वर्षांच्या कामाची SIT चौकशी करा.

मुंबई, दि. २३ जून ;

मुंबई महानगरपालिकेतील २०१९ ते २०२२ या महाविकास आघाडी सरकारच्या काळातील भ्रष्टाचाराची चौकशी एसआयटीमार्फत करण्याचा शिंदे सरकारने निर्णय घेतला आहे. परंतु भाजपा शिवसेनेबरोबर २५ वर्ष मुंबई महानगरपालिकेत सत्तेत होता. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये हिम्मत असेल तर या २५ वर्षात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा, आव्हान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असे नाना पटोले यांनी दिले..

शेतकऱ्यांना बियाणे, खते, पेरणीसाठी पैसे द्या..

राज्यातील शेतकरी संकटामागून संकटाचा सामना करत आहे. अवकाळी पाऊस व गरपीटीनंतर जाहीर केलेली मदत अद्याप शेतकऱ्याला मिळाली नाही. अस्मानी, सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागत आहे. आता पेरणीचा हंगाम सुरु झाला आहे पण शेतकऱ्यांकडे पैसेच नाहीत राज्य सरकारने शेतकऱ्याला बियाणे, खते मोफत द्यावीत व पेरणीसाठी आर्थिक मदत द्यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, प्रभू श्रीरामावर काँग्रेसची आस्था आहे, अयोध्येत राम मंदिर व्हावे यासाठी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी सर्वात आधी प्रयत्न केले. भाजपाला मात्र श्रीराम फक्त मते मागण्यासाठी हवे आहेत. कर्नाटकात त्यांनी मतांसाठी हनुमानाच्या नावाचा वापर करून पाहिला पण बजरंग बलींनी साथ दिली नाही. आताही भाजपा श्रीराम व बजरंग बलीचा वापर मतासाठी करत आहे पण श्रीराम व बजरंगबली खोटारड्या भाजपाला साथ देणार नाही.

No comments to show.

Leave a Comment