पारधी बांधवांना २५ हजारांचे धनादेश!

0
IMG-20200829-WA0029

 

मुंबई दि. 29 :

मालाड , मालवणी अंबोजवाडील पारधी समीजातील २३ लाभार्थ्यांना मुंबईचे शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते स्वयंरोजगारासाठी प्रत्येकी २५ हजार रुपयांचे धनादेश वितरीत करण्यात आले.

जिल्हा वार्षिक योजनेतून पारधी समाज बांधवांना विविध व्यवसाय करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्यावतिने अर्थसहाय्य देण्यात येते. पारधी समाज बांधवांनी स्वयंरोजगार करुन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे यासाठी विविध योजना शासनाच्यावतिने राबवण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून अस्लम शेख यांच्या हस्ते शुक्रवारी मालाड अंबोजवाडीतील पारधी बांधवांना धनादेशांचे वितरण करण्यात आले.

अस्लम शेख याप्रसंगी बोलताना म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटकाला स्वत:चा उत्कर्ष करुन घेण्यासाठी समान संधी मिळणं गरजेचं आहे. पारधी समाजातील तरुण-तरुणींनी पारंपारीक व्यवसायात अडकुन न पडता समृद्धीची, प्रगतीची दारे त्यांनादेखील खुली व्हावीत यासाठी विविध योजन शासनातर्फे राबवण्यात येणार आहेत.

याप्रसंगी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुंबईच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती सुप्रिया चव्हाण व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *