नगर जिल्ह्यातील लोकसभेची एक जागा काँग्रेसला मिळालीच पाहिजे.
नगर जिल्ह्यातील लोकसभेची एक जागा काँग्रेसला मिळालीच पाहिजे:
अहमदनगर, दि. २७ मे ;
अहमदनगर जिल्ह्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत त्यापैकी किमान एक जागा काँग्रेस पक्षाला मिळालीच पाहिजे, अशी आग्रही भूमिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायकराव देशमुख यांनी घेतली आहे.
महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीची बैठक मुंबई येथील टिळक भवनात संपन्न झाली. यावेळी आपली भूमिका मांडताना देशमुख म्हणाले, जिल्ह्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत आणि महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत अशावेळी जेष्ठ नेत्यांनी पक्षाचे चिन्ह नगर जिल्ह्यात टिकवायचे असेल तर किमान एक लोकसभेची जागा काँग्रेस पक्षाकडे घेतलीच पाहिजे. अशाच प्रकारची भूमिका विधानसभेच्या निवडणुकीत देखील घ्यावी लागेल. अन्यथा तालुक्यातील आणि जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये कित्येक वर्षांमध्ये पंजा हे चिन्ह पोहोचू शकले नाही याची पुन्हा पुनरावृत्ती होऊ शकते.
अहमदनगर दक्षिण व शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात व श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांचा समावेश आहे .त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी लोकसभेची जागा काँग्रेस पक्ष निश्चितपणे जिंकू शकेल. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चा होत असताना नेते मंडळींनी या वस्तुस्थितीचे आकलन करून योग्य ते निर्णय घ्यावेत.” अशी अपेक्षा देखील देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली.
